Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 रस्त्यावरचे गॉगल पडणार महागात

वर्धा प्रतिनिधी - उन्हाची सुरुवात झाली अन् उन्हाच्या झळा बसायला लागल्या. उन्हात फिरताना डोक्यावर टोपी आणि डोळ्यावर गॉगल हे गरजेचं बनलं आहे. त

धक्कादायक, कपडे धुवायला गेलेली महिला रक्ताच्या थारोळ्यात
न सांगता थेट प्रश्न करणे म्हणजे मिटकरींचा निव्वळ मुर्खपणा.
छगन भुजबळ यांचे स्विय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांना आरतीचा मान

वर्धा प्रतिनिधी – उन्हाची सुरुवात झाली अन् उन्हाच्या झळा बसायला लागल्या. उन्हात फिरताना डोक्यावर टोपी आणि डोळ्यावर गॉगल हे गरजेचं बनलं आहे. त्यासाठी, अनेकजण रस्त्यावरील गॉगल खरेदी करतात. बरेच लोक उन्हाळ्यात डोळ्यासाठी गोगलचा वापर करतात.तसेच उन्हाळ्यात बाहेर फिरत असताना डोळे लाल होतात, जळजळ करतात अथवा डोळ्यांमध्ये कचरा जाण्याचीही शक्यता असते.. नेत्र तज्ञ सल्ला देतात कि, ह्यागॉगलमध्ये किती प्रमाणात किती अंश प्रमाणात आपल्याला आराम पडू शकतो की नाही. याची निश्चितपणे प्रत्येकानी खात्री करून घ्यावी. ग्लासेसमध्ये बरेच वेळा असे घटक असतात की जे प्लास्टिक स्वरूप असतात.कारण की ते काच नसतात. प्लास्टिक असल्यामुळे आर्थिक बाजूही थोड्या प्रमाणामध्ये सावरले जाते आणि प्रत्येकाला तो ग्लास कमी किमतीमध्ये असल्यामुळे घ्यावासा वाटतो. प्लास्टिक ग्लास वापरल्यामुळे खूप प्रमाणामध्ये डोळ्यांवरती विपरीत परिणाम होऊ शकतात असे नेत्र तज्ञ यांनी सांगितले.मात्र यावर रोडच्या कडेला लागलेल्या दुकानदार यांना विचारणा केली असता त्यांनी आपले गॉगल हे चांगल्या दर्जाचे असल्याचे तसेच ग्राहक आता उन्हाळ्यात मात्र हे गॉगल मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचा सुद्धा या दुकानदारांनी सांगितले.

COMMENTS