पुणतांबा ः गोदामाई प्रतिष्ठानने सामाजिक दायित्व अंगी स्वीकारून सामाजिक उपक्रम सुरू केले हे उपक्रम प्रेरणादायी असून समाजाने याचा आदर्श घ्यावा असे आव्ह
पुणतांबा ः गोदामाई प्रतिष्ठानने सामाजिक दायित्व अंगी स्वीकारून सामाजिक उपक्रम सुरू केले हे उपक्रम प्रेरणादायी असून समाजाने याचा आदर्श घ्यावा असे आव्हान साई आदर्श मल्टीस्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केले. गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने यावर्षी गणेश उत्सव काळात गणेश विसर्जन मिरवणूक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी कपाळे बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुक्ताई ज्ञानपीठाचे महंत रामानंद गिरी महाराज होते. यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय धनवटे सर्जेराव जाधव अनिल नळे आदी मान्यवर उपस्थित होते. गणेश विसर्जन मिरवणूक उत्कृष्ट मिरवणूक ज्या गणेश मंडळांनी काढली त्यात प्रथम बक्षीस शिवाजी तरुण मंडळ द्वितीय एकता मित्र मंडळ तृतीय राष्ट्रसेवा दल उत्तेजनार्थ हनुमान व्यायाम मंडळ काँग्रेस सेवा दल या मंडळांना सन्मान चिन्ह व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी साई आदर्श मल्टीस्टेट चेअरमन कपाळे म्हणाले की, साई आदर्श वतीने सामाजिक उपक्रम हाती घेऊन मल्टीस्टेटच्या नफ्यातून दहा टक्के वाटा सामाजिक उपक्रम गोरगरिबांच्या शैक्षणिक उपक्रमासाठी खर्च केला जातो. गोदामाई प्रतिष्ठानने सामाजिक उपक्रम हाती घेऊन उत्कृष्ट कार्य केले आहे यापुढे देखील गोदावरी प्रतिष्ठानला मल्टीस्टेटच्या वतीने सामाजिक उपक्रमासाठी मदत केली जाईल असे कपाळे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण नाईक यांनी केले, तर सूत्रसंचालन रवींद्र जेजुरकर यांनी केले. यावेळी गणेश मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS