Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वाभिमानीचे एकला चलो रे

लोकसभेच्या सहा जागा लढण्याची राजू शेट्टी यांची घोषणा

सांगली/प्रतिनिधी ः सर्वांची ईडी चौकशी करा. माझ्या चौकशीचा विचार असेल तर त्यासाठी देखील मी तयार आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्ट

साईनंदनवन मध्ये आंब्याचे मोठे नुकसान
नंदुरबारमध्ये पालकांनी शाळेला ठोकले कुलूप
महिलेची तीन लहान मुलासह आत्महत्या

सांगली/प्रतिनिधी ः सर्वांची ईडी चौकशी करा. माझ्या चौकशीचा विचार असेल तर त्यासाठी देखील मी तयार आहे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नमूद केले. दरम्यान राज्यभरात स्वाभिमानी सहा ठिकाणी लोकसभेची निवडणुक लढवेल. आम्ही कोणत्याही पक्षाची युती करणार नाही असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.  सांगली येथे पत्रकारांशी संवाद साधताना राजू शेट्टी म्हणाले राज्यात सहकार व अनेक क्षेत्रात मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. एऊ चौकशी करायची असेल तर या सर्वांचीच करा, फक्त विरोधक आहेत म्हणून चौकशी करू नका असा टोला त्यांनी भाजप सरकाराला लगावला. यामध्ये माझा सुद्धा चौकशी करायची असेल तरी खुशाल करा. मात्र भाजपामध्ये येण्यासाठी दबाव तंत्र वापरू नका असा टोलाही राजू शेट्टी यांनी भापजला लगावला. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी पक्ष कोणत्याही पक्षासमवेत युती करणार नाही. स्वाभिमानी पक्ष हा राज्यभरात सहा ठिकाणी लोकसभा निवडणूक लढणार आहे. यामध्ये मी स्वतः हातकणंगले मतदारसंघातून लढेन असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे राज्यकर्ते आणि राजकारण्यांचे दुर्लक्ष झाले आहे अशी टीका राजू शेट्टी यांनी यावेळी केली. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ते आर्थिक संकटात असताना राज्यकर्त्यांकडून कोणतीही मदत किंवा विचारपूस शेतकर्‍यांची केली जात नाही. त्यामुळे आता या राज्यकर्त्यांच्या विरोधात शेतकरी आवाज उठवेल असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

COMMENTS