Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

जगासमोर ऊर्जा टंचाईचे संकट गडद; इराणकडून कतारच्या सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पांवर हल्ला

तेहरान : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्ष आणखी तीव्र झाला असून, त्याचे परिणाम जागतिक ऊर्जा व्यवस्थेवर दिसू लागले आहेत. कतारमधील सर्वात मोठ्या द्र

गुजरातमध्ये एलपीजी गॅसचे ‘नंदा देवी’ जहाज दाखल
दुबईकडे जाणारी एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द
इराकमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर ड्रोन हल्ला

तेहरान : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्ष आणखी तीव्र झाला असून, त्याचे परिणाम जागतिक ऊर्जा व्यवस्थेवर दिसू लागले आहेत. कतारमधील सर्वात मोठ्या द्रवीकृत नैसर्गिक वायू प्रकल्पावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर ऊर्जा टंचाईचे सावट गडद झाले आहे. या घटनेनंतर संबंधित प्रकल्पातील उत्पादन तात्पुरते थांबवण्यात आले असून, जगभरातील इंधन पुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
28 फेब्रुवारीपासून सुरू झालेला संघर्ष आता वीस दिवसांत ऊर्जा संसाधनांवर थेट हल्ल्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या चोवीस तासांत इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांनी प्रथमच जीवाश्म इंधनाशी संबंधित प्रकल्पांना लक्ष्य केले. त्यामुळे हा संघर्ष केवळ सीमित न राहता जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा देणारा ठरत आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाने आता ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील टप्पा गाठला आहे. इराणकडून कतारमधील महत्त्वाच्या गॅस प्रकल्पांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे या प्रदेशातील तणाव अधिकच तीव्र झाला असून जागतिक पातळीवरही त्याचे परिणाम जाणवण्याची चिन्हे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कतारमधील प्रमुख औद्योगिक क्षेत्र असलेल्या रास लफान औद्योगिक शहर येथे क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. या भागात द्रवीकृत नैसर्गिक वायू निर्मितीच्या अत्याधुनिक सुविधा आहेत. हल्ल्यांमुळे काही प्रकल्पांना आग लागून मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यापूर्वीही या परिसरावर हल्ला झाला होता आणि नव्या कारवाईमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. कतारची सरकारी ऊर्जा कंपनी कतार ऊर्जा यांनी या घटनेची पुष्टी करताना सांगितले की, सलग हल्ल्यांमुळे उत्पादन व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. ज्या प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायू निर्यात केला जातो, तेच लक्ष्य केल्याने जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, इराणने या हल्ल्याची अप्रत्यक्ष कबुली दिल्याचे संकेत मिळत आहेत. प्रादेशिक तणावाच्या पार्श्‍वभूमीवर इराणकडून शेजारी देशांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सौदी अरेबियाने केला आहे.

मुस्लिम राष्ट्रांचा इराणविरोधात कठोर सूर
इराणकडून कतारमधील महत्त्वाच्या वायू प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यानंतर मुस्लिम देशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एकूण बारा मुस्लिम राष्ट्रांनी एकत्र येत इराणला तातडीने आक्रमक कारवाया थांबवण्याचे आवाहन केले आहे. कतारमधील ‘रास लफान’ या मोठ्या वायू केंद्रावर झालेला हल्ला हा केवळ आर्थिक दृष्ट्या नव्हे, तर प्रादेशिक सुरक्षिततेच्या दृष्टीनेही गंभीर मानला जात आहे.


भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती
इराणने केलेल्या या हल्ल्याचा सर्वाधिक फटका ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या देशांना बसू शकतो, त्यात भारताचा समावेश आहे. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे 88 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल परदेशातून आयात करतो, तर नैसर्गिक वायूच्या बाबतीतही 50 टक्क्यांपेक्षा जास्त आयातीवर अवलंबून आहे. विशेषतः कतार हा भारतासाठी वायू पुरवठ्याचा प्रमुख स्रोत आहे. देशात वापरल्या जाणार्‍या द्रवीकृत पेट्रोलियम वायूपैकी सुमारे एक तृतीयांश भाग कतारमधून येतो, तर द्रवीकृत नैसर्गिक वायूच्या आयातीपैकी निम्मा वाटा याच देशाचा आहे. त्यामुळे कतारमधील उत्पादनात अडथळा निर्माण झाल्यास भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

COMMENTS