कडा प्रतिनिधी - दरवर्षी चायना मांजा मुळे मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची गळे चिरतात तर शेकडो पक्षी जखमी व अपंग होतात. पुर्वी पतंग उडवायला दोरी सुती

कडा प्रतिनिधी – दरवर्षी चायना मांजा मुळे मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची गळे चिरतात तर शेकडो पक्षी जखमी व अपंग होतात.
पुर्वी पतंग उडवायला दोरी सुती असायची परंतु सध्या नायलॉन चायना मांजाचे वापर होत आहे हे लवकर तुटत नाही याचे पर्यावरणात विघटन होत नाही तो कुजत नाही तसाच झाडावर किंवा जमीनीवर पडून राहतो यामुळे अनेक पक्षी अडकून मरण पावतात तर काही अपंग होतात.या चायना मांजावर बंदी असताना सर्रास विक्री होत आहे.काल असाच एक दुर्मिळ गव्हाणी घुबड कडा येथे कन्या शाळेच्या जवळ सौरभ ढोबळे व अजित ढोबळे यांच्या शेतात घुबड माजांत अडकवून तडफड करीत आढळले त्याला मांजातून मुक्त केले परंतु उडता येत नव्हते. हि माहिती प्राणिमित्र नितीन आळकुटे यांना समजताच त्यांनी त्या घुबडाला सुरक्षित ठिकाणी ठेवून चारा पाणी उपचार करून सायंकाळी निसर्गाच्या सान्निध्यात सोडुन दिले असला क्षणांतच आकाशात उंच झेप घेतली.
COMMENTS