Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोहित पवारांना पुन्हा संधी द्या : मनीष सिसोदिया

जामखेड येथे जिल्हा परिषद शाळेच्या दहा खोल्यांचे उद्घाटन

जामखेड ः भारत देशात शिक्षण क्षेत्रात काम झाले पाहिजे तरच देशाचे उन्नती होईल शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍यांनाच मतदान केले पाहिजे व त्यावरच राजकार

नशा करणार्‍या अधिकार्‍याची खात्यांतर्गत चौकशी सुरू
भ्रष्टाचार, अनागोंदी आणि टोलवाटोलवी कायमची संपवण्यासाठी ढब्बू मकात्या सत्यांजली अभियान
तरुणाची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला

जामखेड ः भारत देशात शिक्षण क्षेत्रात काम झाले पाहिजे तरच देशाचे उन्नती होईल शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍यांनाच मतदान केले पाहिजे व त्यावरच राजकारण झाले पाहिजे कर्जत जामखेड मतदारसंघात आ रोहित पवार यांचे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे असे नेते दुर्लभ असतात अशा नेत्यांना पुन्हा संधी द्या असे आवाहन दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी केले.
जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेच्या दहा वर्ग खोल्यांचे भूमिपूजन मनीष सिसोदिया यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी आ. रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते नितीन कराळे, राज्य सरचिटणीस राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, सूर्यकांत मोरे, अमोल राळेभात,प्रशांत राळेभात, बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा,शहराध्यक्ष अजय भोसले, सुंदर परदेशी, बजरंग सरडे, कर्जत तालुकाध्यक्ष शंकर शिंदे, चंद्रकांत अधूरे, संजय सदाफुले, दीपक शेळके, ऋषिकेश गांगर्डे,अँड बिपिन वारे, समीर मनियार, चंद्रकांत वनवे, अंगद ढवळे, राजेंद्र गोरे, उमर कुरेशी, प्रकाश काळे, प्रकाश सदाफुले, आदि उपस्थित होते.
यावेळी मनीष सिसोदिया बोलताना म्हणाले की, मी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थळी चोंडी येथील जन्मस्थळाचे दर्शन घेतले. ज्या भूमीत अहिल्याबाईंनी जन्म घेतला त्या भूमीत मला येण्याचे भाग्य लाभले. मी स्वतःला भाग्यवान समजतो. राजकारणात एका पक्षाचा नेता दुसर्‍या एका पक्षाच्या नेत्याला एका शाळेचे उद्घाटन करण्यासाठी बालावतो हे आमदार रोहित पवार यांच्यामुळे पहायला मिळाले. मला दिल्लीहून या ठिकाणी बोलावून घेतले ही असामान्य घटना आहे. आम्ही दिल्लीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात काम करतांना सरकारी शाळेची अवस्था फार बिकट होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व मी ठरवले आणि दिल्लीत चांगल्या पद्धतीने शाळा बांधल्या. शिक्षकांना बाहेरच्या देशात प्रशिक्षणासाठी पाठवले. आज दिल्लीमध्ये शैक्षणिक क्षेत्रात फार मोठा बदल झाला आहे खाजगी ट्युशन न लावता केवळ शाळेतील शिक्षणाच्या बळावर आमचे मुलं आज सीईटी जे डबल इ नीट सारख्या परीक्षा चांगल्या मार्काने पास होत आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक साधुसंतांनी जन्म घेतला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले तसेच थोर संतांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले. परंतु या देशात शिक्षणावर अजून पर्यंत चांगले काम झालेले दिसून येत नाही देशात शिक्षणावर मोठे काम होण्याची गरज आहे. जर सरकारी शाळेमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले तर या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही व भारत प्रगतशील देश होईल जो शिक्षण क्षेत्रावर काम करतो त्या नेत्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आमदार रोहित पवार हे दिल्लीला माझ्या भेटीला आले होते. त्यांनी आम्ही केलेल्या कामाची पाहणी केली. एका नेत्याने दुसर्‍या नेत्याकडून काहीतरी शिकले पाहिजे रोहित पवार यांच्याकडे काम करण्याचे कौशल्य आहे हा कामाचा माणूस आहे असे माणसं दुर्लभ असतात तेव्हा आ रोहित पवार या माणसाला पुन्हा संधी दिली पाहिजे. यावेळी आ रोहित पवार म्हणाले मी शालेय साहित्य व सायकली विद्यार्थ्यांना वाटल्या म्हणून माझ्यावर विरोधक टीका करतात निवडणुकीला आल्यानंतर राजकारण केले पाहिजे परंतु निवडून आल्यानंतर पाच वर्षे राजकारण व भेदभाव बाजूला ठेवून  काम केले पाहिजे. जामखेड शहरातील सर्वात जुनी असलेली मराठी मुलींची शाळा या शाळेसाठी मला इमारत उभारता आली आता मुलांच्या शाळेसाठी सुद्धा मी मंजुरी मिळवली असून अजून 20 ते 22 नवीन खोल्या पुढील एका वर्षात या ठिकाणी उभ्या करु असे आश्‍वासन यावेळी त्यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक शिवाजी राळेभात यांनी केले तर सुजित उबाळे यांनी सूत्रसंचालन केले.

COMMENTS