ओबीसी व मराठ्यांना आरक्षण द्या व भोंग्यातून अजान होऊ द्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी व मराठ्यांना आरक्षण द्या व भोंग्यातून अजान होऊ द्या

रिपब्लिकन पक्षाची निदर्शनाद्वारे मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : ओ.बी.सी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे व मराठा समाजाला आरक्षण द्यावे तसेच मशिदीवरील भोंग्यातून दिल्या जाणार्‍या अजानसाठी रितसर परव

गाडीला कट मारून तिघांकडून दोघांना मारहाण, एकास पकडले
तुमचे आजचे राशीचक्र शनिवार, ०५ जून २०२१ l पहा LokNews24
आदर्श महिला बचत गटाच्या स्वस्त धान्य दुकानाचे उद्घाटन

अहमदनगर/प्रतिनिधी : ओ.बी.सी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे व मराठा समाजाला आरक्षण द्यावे तसेच मशिदीवरील भोंग्यातून दिल्या जाणार्‍या अजानसाठी रितसर परवानगी देण्यात यावी आणि भोंग्यावरुन दोन समाजात तेढ निर्माण करणार्‍यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून करण्यात आली. दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी रिपाईने येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर मंगळवारी निदर्शने केली. तसेच औरंगाबाद येथील मनोज आव्हाड या युवकाच्या अमानुषपणे झालेल्या हत्येचा निषेध केला. यावेळी मराठा, ओबीसी आरक्षण व भोंगा परवानगीची मागणी करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अहमदनगर पक्षाच्यावतीने दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (दि.10 मे) निदर्शने करण्यात आले. यावेळी औरंगाबाद येथील मातंग समाजातील युवक मनोज आव्हाड याच्या अमानुषपणे झालेल्या हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, जिल्ह्याचे नेते संजय कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, नगर तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, मराठा आघाडी प्रमुख महेंद्र झिंझाडे, आकाश तांबे, गौरव साळवे, सतीश भैलुमे, रोहन कदम, योगेश त्रिभुवन, साजिद खान, कृपाल भिंगारदिवे, प्रतीक नरवडे, लोकेश बर्वे, अविनाश कांबळे, बाळासाहेब नेटके, अनिल बर्डे, बाळकृष्ण शेळके, सुरेखा नेटके, किशोर कांबळे, सिकंदर शेख, प्रशांत घोडके, प्रवीण वाघमारे आदींसह रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. शासकीय विश्रामगृह येथे एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने कार्यकर्ते धडकले. विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी व्हावी, औरंगाबाद येथील मातंग समाजातील युवक मनोज आव्हाड हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी, मागासवर्गीय भूमिहीन शेतमजुरांना 5 एकर गायरान जमीन देण्यात यावी, महात्मा फुले विकास महामंडळाच्या एनएफडीसी 4 व 5 लाख रुपयांचा कर्जपुरवठा तात्काळ करण्यात यावा, महात्मा फुले विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, चर्मोद्योग विकास महामंडळ व सर्व महामंडळांमार्फत कर्ज पुरवठा करण्यात यावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशीपमध्ये वाढ करुन ती वेळेवर देण्यात यावी, मागासवर्गीय शासकीय विद्यार्थी वसतीगृहांना अनुदानात वाढ करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांना देण्यात आले.

COMMENTS