पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामास अधिक गती द्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकास कामास अधिक गती द्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याचे

समृद्धी महामार्गाच्या गाडी ड्रायव्हरला मारहाण करून हत्या (Video)
ग्रामपंचायतीचे मतदान जवळ येत असल्याने उमेदवार मतदारांच्या गाठीभेटीला वेग  
दूध उत्पादकांचे आता महामार्ग मेगाब्लॉक आंदोलन

मुंबई : देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले. आज पोहरादेवी येथील महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामध्ये महंत बाबू सिंग राठोड त्याचप्रमाणे मेहताब सिंग नाईक, एड अभय राठोड, पोपट चव्हाण व बंजारा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे काम रखडता कामा नये. वेळच्या वेळी यासाठी निधी दिला जात असला तरी कालबध्द रीतीने कामे पण पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आदींची उपस्थिती होती

COMMENTS