Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इथेनॉलमधील 75 टक्के हिस्सा शेतकर्‍यांना द्या : माजी खा. राजू शेट्टी यांचा कारखानदारांना इशारा

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या सरकारने एफआरपीत बदल करण्याचा अधिकार नसताना बदल केला. केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय हा बद्दल करता ये

खास एफसी या ५ बटाटा वाणाचे पेटंट रद्द | LOKNews24
महावितरणची डिजीटायजेशनकडे वाटचाल : ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्यांचे प्रमाण वाढले
ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक चिंतेत

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्या सरकारने एफआरपीत बदल करण्याचा अधिकार नसताना बदल केला. केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय हा बद्दल करता येत नाही. या सरकारने एफआरपीचे दोन तुकडे केले. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनने केलेल्या आंदोलनामुळे शेतकर्‍यांना एकरकमी एफआरपी मिळाली. एफआरपीचे दोन तुकड्यांचा डाव हाणून पाडला. याचा मला सार्थ अभिमान आहे. एफआरपीच्या सुत्रामध्ये नव्याने बदल होण्याची गरज आहे. यापुढे इथेनॉलमधील
75 टक्के हिस्सा द्या, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खा. राजू शेट्टी यांनी दिला.
वाळवा तालुक्यातील तांबवे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाच्या एकरकमी एफआरपीसाठी केलेल्या आंदोलनास आलेल्या यशाबद्दल माजी खा. राजू शेट्टी यांचा तांबवे गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, भागवत जाधव, पोपट मोरे, अ‍ॅड. एस. यू. संदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी खा. राजू शेट्टी म्हणाले, आता आपण रस्त्यावरची लढाई जिंकलो आहे. एफआरपीच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात अपील केली आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली. मात्र, सांगली जिल्ह्यातील कारखानदार तयार नव्हते. स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे त्यांना गुडघे टेकायला लावले. महाराष्ट्रातील साखर कारखाने मोजक्या राजकीय नेत्यांच्या हातात आहेत. काही कारखाने पवार कुटुंबियांकडे आहेत. दिवसाला त्यांचा 7 हजार टन ऊस गाळप केला जातो. असे आठ ते दहा लोक आहेत. एकूण हिशोब केला तर दीड लाख टन ऊस हेच लोक गाळप करतात.
शेट्टी म्हणाले, या साखर कारखान्याची पहिली उचल 2200 ते 2300 रुपयेदेण्याचे धोरण होते. याने शेतकर्‍यांची सोसायटी तरी फिटली असती का? जिल्हा मध्यवर्ती बँका कारखानदारांना 13 टक्के व्याजाने पैसे देतात. बँकेतील संचालक पोसले जातात. उत्पादन खर्च वाढला आहे. दोन वेळा महापूर येवून गेला. पण शेतकर्‍यांकडे लक्ष द्यायला कोण तयार नाही. पण यावेळी कोणालाही सोडणार नाही. सध्या साखर कारखानदार काटामारी करत आहेत. पुढच्या हंगामात ऑनलाईन काट्याचे वजन होईल. 3000 हजार मिळणारा ऊसाचा भाव हा समाधानकारक नाही. वाढीव भरमसाठ खते, औषधे, वीजबिल पाहाता मीही समाधान नाही. साखर कारखान्याच्या कारखान्यातील संचालकांनाही किंमत दिली जात नाही. ते फक्त चहाच्या कफाचे मानकरी असतात, अशी टिका शेट्टी यांनी केली.
जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कारखानदार मुर्दाड आहेत. संघटनेच्या आंदोलनामुळे एकरकमी एफआरपी मिळाली. शेतकर्‍यांच्या ऊसाची काटामारी करून या नेत्यांचे राजकारण सुरु आहे. यापुढे ऊसाच्या वजनात फरक पडला तर ऊसाचे दांडके हातात घ्यावे लागणार आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना तयार आहे, असा इशारा खराडे यांनी दिला.
हातकणंगले मतदार संघाचे खा. धैर्यशील माने यांनी कधी ऊस प्रश्‍नावर संसदेत आवाज उठवला का? शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर बोलेत का? अशी टीका खराडे यांनी केली. स्वागत व प्रास्ताविक युवा आघाडीचे रविकिरण माने यांनी केले. संयोजन संतोष शेळके, जगन्नाथ भोसले, रामराव जाधव, भगवान सुतार, भास्कर मोरे, शंकरआण्णा पाटील, दत्ताजी पाटील, शिवाजी पाटील, बबन पाटील, अतुल जाधव, नितीन पाटील यांनी केले.

शेअर्स मार्केट घोटाळा करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा. वाळवा तालुक्यात शेअर्स मार्केटचे पेव फुटले आहे. तालुक्यात जवळ जवळअडीशे ते तीनशे कोटी रुपये शेअर्स मार्केटमध्ये बुडाले आहेत. वर्षाला 48 टक्के परतावा जगात कुठली बँक देते का? ही शेतकर्‍यांच्या पोरांची फसवणूक आहे. काही राजकीय गुंतवणुकदारांवर गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणत आहेत. स्थानिक प्रतिनिधींचे याकडे लक्ष नाही. काही शेअर गुतवणूकदारानी स्वतःच्या जमीनी विकल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्या पाठीशी आहे. शेतकर्‍यांच्या पोरांचे पैसे बुडवणार्‍यांवर गुन्हे दाखल करा, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.

COMMENTS