Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रियकराने कर्ज न फेडल्याने प्रेयसीची आत्महत्या

तरूणाने घेतले होते प्रियसीच्या नावावर कर्ज

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहर आणि जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडता असतांना, आता तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या नावावर

13 वर्षीय मुलीची चालत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या
पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या तरुणीची आत्महत्या
2 सख्ख्या बहिणींनी गळफास लावला

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहर आणि जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडता असतांना, आता तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्या नावावर क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन व इतर पाच-सहा पवरून पावणेचार लाख रुपये कर्ज घेतले. मात्र, कर्जाचे हप्ते न फेडता तरुणीला सातत्याने भांडण करून त्रास दिला. प्रियकर आणि वसुली एजंटच्या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रसिका ऊर्फ राणी रवींद्र दिवटे (25, रा. घोरपडी ,पुणे) असे मृत तरुणीचे नाव आहे, तर आदर्श अजयकुमार मिलन (रा. मांजरी, पुणे मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मृत रसिका दिवटेची आई चंदा रवींद्र दिवटे यांनी आरोपीविरोधात हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रसिका दिवटे व आरोपी आदर्श मिलन यांच्यात आठ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. आरोपीने वेळोवेळी तिच्या नावावर क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन व इतर पाच-सहा पवरून पावणेचार लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते फेडण्याचे आश्‍वासन अजयने रसिकाला दिले होते. मात्र, हे कर्ज त्याने फेडले नाही. या कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. प्रियकर आणि वसुली एंजटच्या त्रासाला कंटाळून तरुणीने बेडरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. रसिका ही पुण्यातील बी. टी. कवडे रस्ता येथे राहत होती, तर आरोपी अजय मिलन हा मूळचा संभाजीनगरचा असून दोन वर्षांपूर्वी कामाच्या निमित्ताने तो पुण्यात आला होता. विमाननगर परिसरातील एका आयटी कंपनीत दोघेही नोकरीला होते. रसिका हिच्या नावावर कर्ज घेऊन आरोपीने एक कारही विकत घेतली होती. तसेच खाणे -पिणे आणि फिरण्यासाठी त्यांनी पैसे खर्च केले. न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. रसिका हिने मृत्यूपूर्वी कोणतीही सुसाइड नोट लिहून ठेवली नाही, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक अशोक गंधाले यांनी दिली आहे.

COMMENTS