Homeताज्या बातम्यादेश

झारखंडमध्ये प्रेयसीची हत्या करून केले 50 तुकडे

रांची/वृत्तसंस्था - संपूर्ण देशभरात श्रद्धा वालकर हत्याकांड ताजे असतांना, झारखंडमध्ये देखील आपल्याच प्रेयसीची हत्या करून 50 तुकडे केल्याची धक्का

माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्याकडून नुतन पदाधिका-यांचे अभिनंदन
नांदेड लोकसभेसाठी रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी
पुण्यात 9 ठिकाणी ईडीची छापेमारी

रांची/वृत्तसंस्था – संपूर्ण देशभरात श्रद्धा वालकर हत्याकांड ताजे असतांना, झारखंडमध्ये देखील आपल्याच प्रेयसीची हत्या करून 50 तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंड राज्यातील साहेबगंजमध्ये दिलदार अन्सारीने त्याची मैत्रीण रिबिका पहाडीनचे 50 पेक्षा जास्त तुकडे केले. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून घरात ठेवले होते. त्याने रिबिकाचे काही तुकडे परिसरातील निर्जन ठिकाणी फेकले होते. कुत्रे त्याचे मांस ओरबाडून खात होते. कुत्र्यांना मानवी मांस खाताना लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मुलीचे शीर अद्याप सापडलेले नाही. मृत तरुणी आदिम पहारिया आदिवासी समाजाची होती. ही घटना शनिवारी संध्याकाळची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना बोरिओ ब्लॉकची असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याने सांगितलेल्या ठिकाणांवरून मृतदेहांचे तुकडे गोळा करणे सुरु आहे. पोलिसांनी मृतदेहाचे काही तुकडे ताब्यात घेऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी महिलेचा प्रियकर दिलदार अन्सारी याला बेला टोला येथून अटक केली आहे

COMMENTS