Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेजारणीला ‘आई’ म्हटल्याने मुलीला मारहाण

भिवंडी : शेजारच्या महिलेला प्रेमाने ‘आई’ अशी हाक मारल्यामुळे संतापलेल्या एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या दत्तक मुलीवर अमानुष मारहाण केल्याची धक

अकोटमध्ये विजयी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला
भूमापक माणिक वाघमारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
नांदेडमध्ये शेती व्यवहारातून दोन कोटींची फसवणूक; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडी : शेजारच्या महिलेला प्रेमाने ‘आई’ अशी हाक मारल्यामुळे संतापलेल्या एका महिलेने आपल्या तीन वर्षांच्या दत्तक मुलीवर अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पडघा परिसरातील बापगाव येथे राहणार्‍या दिलशान शेख या महिलेने काही महिन्यांपूर्वी तीन वर्षांची मुलगी दत्तक घेतली होती. काही दिवसांपूर्वी त्या मुलीने शेजारी राहणार्‍या महिलेला प्रेमाने ‘आई’ अशी हाक मारली. या क्षुल्लक कारणावरून दिलशान शेख संतापली. संतापाच्या भरात तिने मुलीला घरात बंद करून तिच्या डोळ्यांत आणि तोंडात मिरची पूड टाकली. त्यानंतर तिला निर्दयपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे चिमुरडी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृतीही बिघडली होती. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर प्रकरण उघड झाले. त्या चित्रफितीत आरोपी महिला मुलीला मारहाण करताना दिसते. तिचा पती तिला थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत असला तरी ती संतापाच्या भरात मुलीला मारहाण करत असल्याचे दिसते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मुलीची सुटका केली. जखमी मुलीला पुढील उपचार आणि सुरक्षिततेसाठी बाल निरीक्षणगृहात हलवण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS