शिर्डी ः साईबाबांचे भक्त हे सणासुदीच्या वेळेस बाबांवर असलेल्या श्रद्धा पोटी नाविन्यपूर्ण भेट देत असतात. सोमवारी रक्षाबंधनाच्या दिवशी छत्तीसगडमधील
शिर्डी ः साईबाबांचे भक्त हे सणासुदीच्या वेळेस बाबांवर असलेल्या श्रद्धा पोटी नाविन्यपूर्ण भेट देत असतात. सोमवारी रक्षाबंधनाच्या दिवशी छत्तीसगडमधील बिलासपूर येथील साईमाऊली परिवाराकडून श्री प्रबोधराव यांनी श्री साईबाबांना साधारण 35 किलो वजनाची 36 फुट लांब व 05 फुट रुंद अशी भव्य राखी समर्पित केली.
या बद्दल प्रबोधराव यांनी सांगितले की, ही राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी 10 दिवसांत बनवली असून यामध्ये फायबर प्लाय, मोती, जरी, बुटी आदींचे काम करण्यात आले आहे. श्री साईनाथांनी लक्ष्मीबाईंना दिलेली नऊ नाणींची थीम या राखीमध्ये समाविष्ट केली आहेत. प्रत्येक नाणे श्रीमद भागवत आणि श्री रामचरितमानस यांच्या नवविधा भक्तीचे एक वैशिष्ट्य दर्शवते, तेच या राखीमध्ये समाविष्ट केले आहे. या राखीचे श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदिना गाडीलकर, उप मुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ ज्योती हुलवळे तसेच राखी देणगीदार साईभक्त प्रबोधराव यांचे हस्ते विधीवत पुजन करणेत आले. यावेळी मंदिर विभागप्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी व कर्मचारी उपस्थित होते
COMMENTS