Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नरेश राऊत फाउंडेशनकडून पाडाळणे शाळेस अ‍ॅक्टिह बोर्ड भेट

अकोले ः राहाता तालुक्यातील केलवड येथील नरेश राऊत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडाळणे येथील शाळेस 65

व्यापारी संकुलाचे आज खा. शरद पवारांच्या हस्ते भूमिपूजन
प्रोजेक्टचे रूपांतर प्रॉडक्टमध्ये व्हावे ः नितीनदादा कोल्हे
सिव्हील सर्जनच्या गाडीने अचानक घेतला पेट…

अकोले ः राहाता तालुक्यातील केलवड येथील नरेश राऊत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेने आदिवासी भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडाळणे येथील शाळेस 65 इंची इंटर ऍक्टिव्ह बोर्ड भेट दिला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये भर पडावी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वापर व्हावा व गुणवत्ता सुधारावी या उदात्त हेतूने हे कार्य श्री. नरेश फाउंडेशनने घडवून आणले.
यासाठी श्री. नरेश राऊत फाउंडेशनचे अध्यक्ष नरेशजी राऊत तसेच सचिव लक्ष्मणजी गोर्डे यांचे सहकार्य तसेच मार्गदर्शन लाभले. या कामात शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकुमार सावंत व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य बाळासाहेब सावंत यांनी संपर्क व प्रयत्न केले. सदर इंटर ऍक्टिव्ह बोर्ड चे वितरण आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडाळणे येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास महाले  यांच्या हस्ते तसेच गावच्या सरपंच रोहिणीताई बगाड, उपसरपंच विकास तळेकर गावचे सामाजिक कार्यकर्ते रामशेठजी तळेकर, पोलिस पाटील राजू राधाकृष्ण तळेकर तसेच आकाश तळेकर, रवी तळेकर आदी ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक मिना पडवळे तसेच शिक्षक काशिनाथ गभाले, अनिल सोनवणे, मुरलीधर बारामते, प्रवीण साळवे, लालू भांगरे आदींनी आभार मानले. तसेच नरेश फाउंडेशनचे अध्यक्ष नरेश राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हा सोहळा संपन्न झाला.

COMMENTS