केज प्रतिनिधी - केज तहसील कार्यालया समोर लाईटच्या विविध मागण्या संदर्भात महा वितरण कार्यालयाच्या विरोधात युवा नेते श्रीकांत घुले यांच्यासह चिंचोल
केज प्रतिनिधी – केज तहसील कार्यालया समोर लाईटच्या विविध मागण्या संदर्भात महा वितरण कार्यालयाच्या विरोधात युवा नेते श्रीकांत घुले यांच्यासह चिंचोली माळी जिल्हा परिषद सर्कल मधील शेतकरी हे आमरण उपोषणास बसले होते.परंतु महावितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता नरेंद्र चामाटे व प्रभारी सहाय्यकअभियंता श्रीनाथ शहाणे यांच्या मध्यस्थीने व लेखी आश्वासनानंतर तात्पुरत्या स्वरूपात सदरील उपोषण मागे घेण्यात आले आहे.या बाबतची सविस्तर माहिती अशी की,दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी केज तहसील कार्यालया च्या समोर युवा नेते श्रीकांत घुले यांच्यासह चिंचोली माळी जिल्हा परिषद सर्कल मधील शेतकरी हे चिंचोलीमाळी सबस्टेशन येथे 5 एम व्हि एवढ्या कॅपिसिटीचा ट्रांसफार्मर चालू आहे.परंतु या ट्रांसफार्मर वरील लोड पाहता तो पुरेसा नाही त्यामुळे या ठिकाणी आणखी एक मोठा ट्रांसफार्मर तात्काळ बसवण्यात यावा म्हणजे जेणेकरून चिंचोली माळी येथील सबस्टेशन अंतर्गत येणार्या सर्व गावांना वीज पुरवठा सुरळीत चालू राहील.केज तालुक्यातील टाकळी येथील गावठाण येथे फिडर तात्काळ मंजूर करून त्यांचे काम लवकरात लवकर चालू करण्याचे आदेश देण्यात यावेत.केज तालुक्यातील सर्व गावातील शेतातील डीपीचे जळालेले ट्रान्सफॉर्मर हे उपविभाग केज येथेच दुरुस्त करून शेतकर्यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत जेणेकरून केज तालुक्यातील सर्व शेतकर्यांना याचा फायदा होईल व शेतकर्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही यासह अनेक लाईटच्या मागण्या करिता युवानेते श्रीकांत घुले यांच्यासह चिंचोली माळी जिल्हा परिषद सर्कल मधील शेतकरी हे आमरण उपोषणास बसले होते.परंतु महावितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता नरेंद्र चामाटे व प्रभारी सहाय्यकअभियंता श्रीनाथ शहाणे यांनी सदरील उपोषणाची दखल घेऊन ते उपोषण स्थळी उपस्थित राहून उपोषणकर्ते युवा नेते श्रीकांत घुले व शेतकर्यां सोबत चर्चा करून उपोषणकर्त्यांना चार दिवसात त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करून देतो असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण कर्त्यानी महावितरणचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता व प्रभारी सहाय्यक यांनी नारळ पाणी पाजल्यानंतर उपोषणकर्ते युवा नेते श्रीकांत घुले व शेतकर्यांनी तात्पुरता स्वरूपात उपोषण मागे घेतले आहे.उपोषण कर्ते श्रीकांत घुले यांनी प्रशासनाने तात्काळ कामे चार दिवसात केली नाही तर यापुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.यावेळी टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच पती अनंतकुमार घुले,सरपंच मुकुंद कणसे,बजरंग बप्पा सोनवणे यांचे स्वीय सहाय्यक बालाजी सोनवणे,उपोषणकर्ते युवा नेते श्रीकांत घुले,माजी नगरसेवक कपिल मस्के यांच्यासह चिंचोली माळी जिल्हा परिषद सर्कल मधील शेतकरी व कार्यकर्ते उपोषण स्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS