घर खाली करण्यासाठी मारहाण, भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घर खाली करण्यासाठी मारहाण, भाजप नगरसेवकाविरोधात गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी : घर खाली करण्यासाठी एका कुटुंबीयाच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी मनपातील भाजप नगरसेवक स्वप्नील शिंद

संगमनेरात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा
मनपा लेखाधिकारी मानकरच्या घरातून लाखोंचे घबाड जप्त ; 22 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
देवळाली नगरपालिकेकडून 3 ठिकाणी कृत्रिम विसर्जन केंद्र

अहमदनगर/प्रतिनिधी : घर खाली करण्यासाठी एका कुटुंबीयाच्या घरात अनाधिकाराने प्रवेश करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी मनपातील भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेसह सहा ते सात जणांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु कारभारी गोंडगीरे (वय 48 रा. रेणुकानगर, औरंगाबाद रोड, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नगरसेवक स्वप्नील शिंदे, आभि बुलाखे व इतर चार ते पाच जणांचा समावेश आहे. राजु गोंडगीरे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. ते सावेडी उपनगरातील बोरा यांच्या मालकीच्या जागेत मागील 50 वर्षांपासून राहत आहेत. 11 मार्च 2022 रोजी रात्री शिंदे, बुलाखे व इतरांनी गोंडगीरे यांच्या घरामध्ये प्रवेश करून घर खाली करण्यासाठी गोंडगीरे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करत घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच घर खाली करण्याच्या कारणासाठी 11 मार्च, 2022 रोजी साडेआठच्या सुमारास शिंदे व इतरांनी गोंडगीरे यांना शिंदे यांच्या कार्यालयात बोलावून डांबून ठेवत लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिंदे व इतरांनी यापूर्वीदेखील फोन करून व घराचे नुकसान करून मला घर खाली करण्यासाठी त्रास दिला होता. तशी तक्रार तोफखाना पोलिसांकडे करण्यात आली होती, असेही गोंडगीरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी नगरसेवक शिंदेसह त्याच्या साथीदारांविरूध्द भादंवि कलम 452, 342, 324, 143, 147, 148, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.

COMMENTS