Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घर घर लंगर सेवेने साजरी केली रस्त्यावरील वंचितांची दिवाळी वंचितांना फराळचे वाटप

एकत्रितपणे पणत्या प्रज्वलीत करुन गरीब-श्रीमंतीच्या दरीचा अंधकार दूर करण्याचा उपक्रम

अहमदनगर प्रतिनिधी - कोरोनाच्या संकटकाळापासून शहरातील गरजू गोर-गरीब घटकांना आधार देणार्‍या घर घर लंगर सेवेने रस्त्यावरील वंचितांची दिवाळी साजरी केली.

आरबीआयच्या पथकाकडून ’नगर अर्बन’बँकेमध्ये तपासणी | DAINIK LOKMNTHAN
शहापूर सोसायटी चेअरमनपदी घारे तर व्हा. चेअरमनपदी डांगे
थोरात कारखान्याचा गुरुवारी गळीत हंगाम सांगता समारंभ

अहमदनगर प्रतिनिधी – कोरोनाच्या संकटकाळापासून शहरातील गरजू गोर-गरीब घटकांना आधार देणार्‍या घर घर लंगर सेवेने रस्त्यावरील वंचितांची दिवाळी साजरी केली. रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरजूंना फराळचे वाटप करुन त्यांच्यासोबत दिवे प्रज्वलीत करुन दिवाळी साजरी करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. मध्यरात्री मिळालेली अनोखी दिवाळी भेट पाहून अनेक गरजूंच्या चेहर्‍यावर आनंद फुलले.
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात झोपलेल्या गरजूंना फराळ देऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर माळीवाडा बस स्थानक, पुणे बस स्थानक व मार्केटयार्ड परिसरातील गरजूंना फराळ देऊन त्यांच्याबरोबर पणत्या प्रज्वलीत करुन आतषबाजीच्या आनंद घेत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच प्रवासी व बस चालकांना देखील फराळचे वाटप करण्यात आले. उड्डाणपुलाचे काम करणार्‍या कामगारांना देखील ही दिवाळी भेट देण्यात आली. मदत घेऊन आलेल्या सेवादारांनी गरीब-श्रीमंतीच्या दरीचा अंधकार दूर होण्याचा या उपक्रमातून संदेश दिला.
वंचितांची दिवाळी साजरी करण्याच्या उपक्रमात हरजितसिंह वधवा, प्रशांत मुनोत, राजेंद्र कंत्रोड, राजा नारंग, करन धुप्पड, कैलाश नवलानी, यश मुनोत, दलजितसिंह वधवा, हरमनकौर वधवा, प्रांजल मुनोत, गुरनूरसिंह वधवा, संदेश रपारिया आदी सहभागी झाले होते. या उपक्रमास लायन्स क्लब व लिओ क्लब ऑफ अहमदनगरच्या सदस्यांचे सहकार्य लाभले.

COMMENTS