बीड : माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथे मेंढपाळ बांधवांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणातील आरोपींना त

बीड : माजलगाव तालुक्यातील घळाटवाडी येथे मेंढपाळ बांधवांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी समता परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. ओबीसी नेते तथा समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस ड. सुभाष राऊत यांनी जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
यावेळी बोलताना अॅड. सुभाष राऊत म्हणाले की, राज्यात वारंवार मेंढपाळांसह ओबीसी समाजावर हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. ओबीसी समाजावर अन्याय होत असताना आम्ही शांत बसणार नाही. समाजबांधवांनी अन्यायाविरोधात ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, अॅड. सुभाष राऊत यांनी मारहाण झालेल्या बीटे बंधूंच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा धनगर समाजासह ओबीसी समाजाच्या वतीने माजलगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. संदीप बेदरे, पांचाळ समाज सोनार संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पंडित, समता परिषदेचे बीड शहराध्यक्ष निखिल शिंदे, युवा नेते नितीन राऊत, धनंजय काळे यांच्यासह धनगर समाज व ओबीसी समाजाचे अनेक बांधव उपस्थित होते.

COMMENTS