Homeताज्या बातम्याविदेश

जर्मनीचे वर्ल्डकप विजेते फुटबॉलपटू ब्रेहम यांचे निधन

बर्लिन : जर्मनीचे विश्वकरंडक फुटबॉल विजेते खेळाडू अँड्रियास ब्रेहम (वय ६३) यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे मंगळवारी निधन झाले. १९९०च्या विश्वकरंड

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा थरारक विजय
योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ‘ध्रुव’चे यश
पुणे येथे लष्करी अधिकारी महिलेची आत्महत्या; वरिष्ठा विरोधात गुन्हा दाखल

बर्लिन : जर्मनीचे विश्वकरंडक फुटबॉल विजेते खेळाडू अँड्रियास ब्रेहम (वय ६३) यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे मंगळवारी निधन झाले. १९९०च्या विश्वकरंडक स्पर्धेत अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत ब्रेहम यांनी पेनल्टीवर गोल करून जर्मनीला तिसरे विजेतेपद मिळवून दिले होते. रोम येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी दिएगो मरैडोना यांच्या अर्जेंटिना संघाला पराभवाचा धक्का दिला होता. ब्रेहम हे म्युनिक आणि रेयाल झारोगोझा या संघातून खेळले होते.

COMMENTS