मुंबई ः मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी मध्य रेल्वेच्या 11 कर्मचार्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार प्रदान केला आहे. ज्यामध्ये

मुंबई ः मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी मध्य रेल्वेच्या 11 कर्मचार्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार प्रदान केला आहे. ज्यामध्ये मुंबई विभागातील 2, नागपूर विभागातील 3, भुसावळ विभागातील 3, सोलापूर विभागातील 2 आणि पुणे विभागातील 1 कर्मचार्यांचा समावेश आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात नोव्हेंबर-2023 ते जानेवारी-2024 या कालावधीत कर्मचार्यांनी कर्तव्य बजावत असताना घेतलेल्या दक्षता, अनुचित घटना रोखण्यामध्ये आणि सुरक्षेची खात्री करण्यामध्ये दिलेल्या योगदान याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारामध्ये एक पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्यासाठी प्रशस्तीपत्र आणि रु 2000/- रोख पारितोषिक याचा समावेश आहे. यामध्ये समीर हांडे, पॉइंट्समन, मस्जिद स्टेशन, मुंबई विभाग, तर विजय महादेव परब, फिटर (सी अन्ड डब्लू ), दादर, मुंबई विभाग, यासोबतच जितेंद्र कुमार, ट्रॅक मेंटेनर, चांदूर बाजार, भुसावळ विभाग, यांच्यासोबतच सुनील शांताराम, ट्रॅक मेंटेनर, वाघोडा, भुसावळ विभाग, आनंद पटले, स्थानक उपव्यवस्थापक, शेगाव, भुसावळ विभाग, रुद्र खांडेकर, सहाय्यक लोको पायलट, नागपूर, नागपूर विभाग, देवेंद्र बोरबन, सहाय्यक लोको पायलट, आमला, नागपूर विभाग, सागर राजाराम वाघचौडे, पॉइंट्समन, मालखेड, नागपूर विभाग यांचा गौरव करण्यात आला आहे.
सोलापूर विभागातील दोघांचा समावेश – सोलापूर विभागातील विनायक महादेव घोडके, ट्रेन व्यवस्थापक, यांनी 12 जानेवारी 2024 रोजी डाउन मालगाडी मध्ये, शाहबाद स्टेशनवर ड्युटीवर असताना, त्यांच्या लक्षात आले की अप मालगाडीच्या एका वॅगनचे अडॅप्टर कमीत कमी 35 ते 40 अंश, वाकलेल्या स्थितीत होते जे धोकादायक ठरले शकते. त्यांनी ताबडतोब सर्व संबंधितांना माहिती दिली, तो डब्बा वेगळा करण्यात आला आणि त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य गंभीर अपघात टळला. यासोबतच धीरेंद्र कुमार, सहाय्यक लोको पायलट, दौंड, सोलापूर विभाग, 21 जानेवारी 2024 रोजी कर्तव्यावर असताना, लोको क्रमांक 23553 च्या अंडर गियरच्या तपासणीदरम्यान पदभार स्वीकारल्यानंतर, ट्रॅक्शन मोटार क्रमांक 4 च्या होरिझोनटल नोझ पिन गहाळ असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ ड्युटीवर असलेल्या लोको पायलटला माहिती देऊन आवश्यक ती कारवाई करण्यात आली. त्यांचे बारकाईने निरीक्षण आणि तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
COMMENTS