Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामनवमी निमित्त गीतरामायण कार्यक्रमाचे आयोजन

नगर -  श्रीरामनवमी निमित्त श्री.  प्रसाद सोन्याबापू शेटे प्रस्तुत गीतरामायण हा कार्यक्रम दि.६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वा. माऊली सभा

डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती राहटी बु. येथे उद्या होणार साजरी  
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील अपघातात दोघांचा मृत्यू
बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये दोन कर्मचार्‍यांचे संगनमत; 3.26 कोटींचा केला अपहार

नगर –  श्रीरामनवमी निमित्त श्री.  प्रसाद सोन्याबापू शेटे प्रस्तुत गीतरामायण हा कार्यक्रम दि.६ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वा. माऊली सभागृहात, सावेडी, अहिल्यानगर येथे आयोजन करण्यात आले आहे.

     या गीत रामायणात महाकवी ग.दि. माडगुळकर व स्वरतीर्थ सुधीर फडके यांची अजरामर कलाकृती सादर होणार आहे.हे गीतरामायण श्री. प्रसाद सोन्याबापु शेटे सादर करणार आहेत. त्यांना सहगायिका सौ. श्रद्धा अमित बाजारे-शेटे,  सौ. रेणुका संतोष पवार साथ देणार आहेत. निवेदिका – सौ .विणा दिघे, व्हायोलीन – श्री .धनंजय गाडगीळ  (सांगली),   सिंथे सायजर- श्री. सत्यजीत सराफ  (संगमनेर), बासरी- श्री. सचिन वाघमारे  (पुणे), संवादिनी – श्री .मकरंद खरवंडीकर सर, तबला – श्री. हर्षदजी भावे आणि श्री.प्रसाद जी सुवर्णपाठकी, .तालवाद्य – श्री .कुलदीप चव्हाण यांची साथ मिळणार आहे.  हा गीत रामायण कार्यक्रम विनामूल्य असून  अहिल्यानगर भाविक,रसिक आणि संगीतप्रेमी श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री. प्रसाद शेटे यांनी केले आहे.

COMMENTS