Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औंधमध्ये रथ मार्गाचे गायत्रीदेवींच्या हस्ते भूमिपूजन

औंध / वार्ताहर : औंधमधील रथ मार्ग व बंदिस्त गटार या विकासकामांचे भूमिपूजन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते उत्साहात झाले. या भूमिपूजन सोह

राष्ट्रवादी विरोधक एकसंघ ठेवणे भाजपासाठी कसरत : निशिकांत पाटील यांना स्वकीयांचाच अडथळा
शिक्षकांच्या अनुकंपासह पायाभूत वाढीव पदांचा प्रश्न मार्गी लागणार
सातार्‍यात आज भाजप नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा

औंध / वार्ताहर : औंधमधील रथ मार्ग व बंदिस्त गटार या विकासकामांचे भूमिपूजन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते उत्साहात झाले. या भूमिपूजन सोहळ्यास स्थानिक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला युवा नेते योगेश फडतरे, मनीषा फडतरे, शुभम शिंदे, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, गणेश देशमुख, दिपक नलवडे, सदाशिव पवार, शहाजी यादव, पैलवान मंगेश फडतरे यांसह औंध आणि परिसरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती व नागरिक उपस्थित होते.
नूतन रथ मार्ग उभारणीमुळे औंधचा रथोत्सव, नवरात्रोत्सव, शाही दसरा मिरवणूक यांसारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यांना नवे व्यासपीठ मिळणार आहे. औंधमधील वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या मार्गामुळे औंधच्या पारंपरिक उत्सवांना नवी ऊर्जा मिळेल, असेही मान्यवरांनी सांगितले.
औंधचा विकास हा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी केलेल्या प्रयत्नातून आणि लोकसहभागातून शक्य आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. रथ मार्गाचे काम केवळ एक प्रकल्प नसून, औंधच्या सांस्कृतिक ओळखीला बळ देणारे नवे पाऊल आहे. या ऐतिहासिक वारसा असणार्‍या परंपरा जपण्यासाठी आपण सर्वांनी या विकासाचे शिलेदार बनले पाहिजे, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक कार्यकर्त्यांनी केले, तर आभार प्रदर्शनाने समारोप झाला.

COMMENTS