Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यावर गावठी कट्टयाने झाडल्या सहा गोळ्या

श्रीगोंदे तालुक्यातील थरार ; शेतकर्‍याची प्रकृती चिंताजनक

लोकमंथन प्रतिनिधी - श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा शिवारातील मढेवडगाव-चिंभळा रस्त्यालागतच्या हॉटेल पन्हाळा येथे संतोष ऊर्फ लाला बबन गायकवाड (वय 30

आ. जगतापांचा कोट्यवधीचा भ्रष्टाचार…मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
राहाता नगरपरिषद मुंबई दुर्घटनेतून धडा घेणार का ?
गुहा येथे कार व बसची समोरासमोर धडक ; चार ठार

लोकमंथन प्रतिनिधी – श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळा शिवारातील मढेवडगाव-चिंभळा रस्त्यालागतच्या हॉटेल पन्हाळा येथे संतोष ऊर्फ लाला बबन गायकवाड (वय 30 वर्षे) आणि जयदीप दत्तात्रय सुरमकर रा. चिंभळा यांची शेत जमिनीच्या आर्थिक व्यवहाराबाबत चर्चा सुरु असताना सुरमकर याने स्वतःजवळच्या गावठी कट्ट्यातून गायकवाड यांचेवर सहा गोळ्या झाडल्या. जखमी गायकवाड यांना तातडीने पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, याप्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिंभळा शिवारातील मढेवडगाव-चिंभळा रस्त्यालागतच्या हॉटेल पन्हाळा येथे सोमवार 09 ऑक्टोबर रोजी रात्री साडेसात वाजनेच्या सुमारास संतोष ऊर्फ लाला बबन गायकवाड आणि जयदीप सुरमकर यांच्या शेतजमिनीच्या आर्थिक व्यवहारावरून वाद निर्माण झाला. आरोपी जयदीप सुरमकर याने सोबत आणलेल्या गावठी कट्ट्यातून गोळीबार करत लाला गायकवाड यांचेवर गोळ्या झाडल्या. गायकवाड यांनी प्रसंगावधान राखत हॉटेलच्या तारेच्या कंपाऊंडवरून जिवाच्या भीतीने मढेवडगावच्या दिशेने पळत सुटले असता सुरुमकर याने लाला यांचा पाठलाग करून त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने छातीवर, कानावर, डाव्या हाताच्या दंडावर, हाताच्या पंजावर उजव्या पायाच्या खुब्यावर तसेच गुप्त भागावर एकूण सहा गोळ्या झाडल्या असल्याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात लाला यांचे चुलत भाऊ सुनिल राजू गायकवाड यांनी फिर्याद नोंदवली आहे. आरोपी सुरुमकर हा मात्र पसार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांना खबर मिळताच बेलवंडी व श्रीगोंदा पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित होता. रात्री उशिरा नगर येथील फॉरेन्सिक लॅब पथक, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे, बेलवंडी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, श्रीगोंदा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले, उपनिरिक्षक प्रकाश चाटे, मोहन गाजरे, समीर अभंग, रोहिदास झुंजार घटनास्थळी येऊन तपास करत होते. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व उपनिरिक्षक मोहन गाजरे करत आहेत.

तालुक्यातील नदीपट्टयात गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर   – तालुक्यातील नदी पट्ट्यात वाळूची अवैध चोरटी वाहतूक हा नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न असून गावठी कट्ट्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर दहशत निर्माण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच चोर्‍या, दरोडे, स्वस्तात सोने, खाजगी सावकारी या घटनांमधून वाढत्या गुन्हेगारीचा बोमोड करणे आवश्यक आहे. मात्र अनेक घटनांमध्ये पोलिसांना माहिती देवूनही आरोपी पसार होत असल्याने सर्वसामान्य नागरिक मात्र दहशतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत.

COMMENTS