Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बार्शीत गौतमी पाटील चा कार्यक्रम पोलिसांनी बंद पाडला

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत गौतमी पाटीलचा शो आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड मित्र मंडळ या संस्थेने ग

आपला दवाखान्याची वेळ गैरसोयीची
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
लातूरची एसटी सुसाट; ’मे’ महिन्यात 2 कोटींचा नफा !

सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत गौतमी पाटीलचा शो आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड मित्र मंडळ या संस्थेने गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरू होणारा कार्यक्रम रात्री साडेनऊ दरम्यान सुरू झाला. बार्शी तालुक्यातील शहराच्या मुख्य ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गौतमी पाटीलला यायला उशीर झाल्याने मोठ्या संख्येने प्रेक्षक ताटकळत उभे होते. दहा वाजण्याच्या सुमारास ऐनवेळी बार्शी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता घेत डीजे बंद केले व कार्यक्रम देखील बंद पाडायला भाग पाडले. यामुळे गौतमी पाटीलच्या लावणीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या बार्शीकराना एकच गाण्यांवर समाधान मानावे लागले. बार्शी शहरातील मुख्य ठिकाणी गौतमी पाटीलची लावणी आयोजित करण्यात आली होती. गौतमी पाटील येणार आहे,यासाठी अनेकांनी सायंकाळी सहा वाजल्यापासून कार्यक्रमाच्या ठिकाणी तिकीट काढून हजेरी लावली होती. कार्यक्रम सुरू व्हायला खूप उशीर झाला होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास गौतमी पाटील कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्याबरोबर शिट्यांनी व प्रेक्षकांच्या आवाजामुळे परिसर दणाणून गेला. साडेनऊच्या सुमारास लावणीला सुरुवात झाली. दहा वाजताच बार्शी पोलिसांनी ताबडतोब डीजे बंद करायला लावला. कार्यक्रमाच्या ठिकाणी रात्री उशिरा कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी किंवा गोंधळ नको अशी भूमिका घेत ,पोलिसांनी लावणी कार्यक्रम बंद केला.  राजेंद्र गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला २०० रुपये तिकीट आकारण्यात आले होते. तिकीटावर सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल असा उल्लेख होता. त्यामुळे अनेकांनी शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाठिकाणी हजेरी लावली होती. गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरू व्हायला रात्रीचे साडेनऊ वाजले. लावणीने कार्यक्रमास सुरुवात होताच १५ ते २० मिनिटांत पोलिसांनी कार्यक्रम बंद केला. गौतमीच्या चाहत्यांना फक्त एकाच लावणीवर समाधान मानावे लागले

COMMENTS