Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चित्रकला परीक्षेत गौतम पब्लिक स्कूलचे यश

कोपरगाव प्रतिनिधी  : सप्टेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या शासकिय चित्रकला परीक्षांचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्य

पृथ्वी असेपर्यंत छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याची हिंमत होऊ नये बावनकुळे यांची अपेक्षा
भिंगारच्या जुगार अड्ड्यावर छापा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
आगडगावमध्ये नवरात्र उत्सव निमित्ताने महिला अखंड हरिनाम सप्ताह 

कोपरगाव प्रतिनिधी  : सप्टेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या शासकिय चित्रकला परीक्षांचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. इलेमेंटरी चित्रकला परीक्षेत शाळेतील एकूण 119 विद्यार्थी व इंटरमीजीएट परीक्षेस 59 विदयार्थी प्रविष्ठ झाले होते. या परीक्षेत एकूण 177 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे. शाळेचा इलेमेंटरी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागलेला असून या परीक्षेत कु.पवार वैष्णवी ज्ञानेश्‍वर, चि.देशमुख रितेश ज्ञानेश्‍वर हे 02 विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत तर 45 विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहे. इंटरमीजीएट परीक्षेचा निकाल 98.30 टक्के लागला असून या परीक्षेत चि.खडसे निरज प्रविण व कु.तासकर प्रगती वैभव हे 02 विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत तर 09 विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहे. शासकिय चित्रकला परीक्षेत कोळपेवाडी केंद्रातून गौतम पब्लिक स्कूलने सर्व शाळांच्या तुलनेत सर्वोच्य निकालाची पंरपरा कायम राखलेली आहे. सध्याच्या युगात करिअर करण्याच्या सर्वाधीक संधी कला क्षेत्रात उपलब्ध आहेत. कला क्षेत्राचा अर्थ चित्रकारीता, गायन, नृत्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात कलाकारांसाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत आणि या सर्व कला प्रकारामध्ये गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी आपला ठसा उमटवत आहे. शाळेत वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देवून विद्यार्थ्यांमधील अभिव्यक्ती सृजनशील करण्यासाठी गौतम पब्लिक स्कूलमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग करून शाळेच्या नावलौकीकात भर टाकत असल्याची माहीती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे कलाशिक्षक गोरक्षनाथ चव्हाण, माध्यमिक सुपरवायझर ज्योती शेलार यांचे मार्गदर्शन लाभले आहे.विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व कला शिक्षकाचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, विश्‍वस्त आ.आशुतोष काळे, सचिव चैतालीताई काळे, सर्व संस्था सदस्य आदींनी अभिनंदन केले.

COMMENTS