गौतम अदानी आता जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गौतम अदानी आता जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली/प्रतिनिधी :प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीचा आलेख सातत्याने चढता असून, त्यांनी मंगळवारी फ्रान्सच्य

मराठी भाषा भवनासाठी 260 कोटींची तरतूद
कर्नाटकमध्ये महाराष्ट्राच्या गाड्यांना पुन्हा फासले काळे !
जामखेड शहरात अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या

नवी दिल्ली/प्रतिनिधी :प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीचा आलेख सातत्याने चढता असून, त्यांनी मंगळवारी फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकत जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या इंडेक्सनुसार, अदानी यांनी 137.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह लुई व्हिटॉनचे प्रमुख अरनॉल्ट यांना मागे टाकले आहे.
टॉप थ्री च्या रँकिंगमध्ये अदानी आता एलोन मस्क आणि जेफ बेझोस यांच्या मागे आहेत. ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत टॉप थ्री श्रीमंतांमध्ये एखाद्या आशिया खंडातल्या व्यक्तीचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या इंडेक्समध्ये 11 व्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती 91.9 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. एलोन मस्क यांची संपत्ती सध्या 251 बिलियन अमेरिकन डॉलर तर जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती 153 बिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. अदानी समूहामध्ये ऊर्जा, बंदरे, लॉजिस्टिक, खाणकाम, संसाधने, गॅस, संरक्षण, एरोस्पेस आणि विमानतळ या उद्योगांचा समावेश आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा समूहानंतर अदानी समूह हा हिंदुस्थानातील तिसरा सर्वात मोठा समूह आहे. अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी ट्रान्समिशन या अदानी समूहाच्या कंपन्या आहेत. गेल्या 5 वर्षांमध्ये अदानी एंटरप्रायझेसने विमानतळ, सिमेंट, कॉपर रिफायनिंग, डेटा सेंटर्स, ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल रिफायनिंग, रस्ते आणि सोलर सेल मॅन्युफॅक्चरिंग या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. येत्या काळात अदानी समूह टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले जात आहे.

COMMENTS