Homeताज्या बातम्याविदेश

पाकिस्तानमध्ये गॅस सिलिंडर तीन हजार पार

इस्लामाबाद ः भारतात महागाईची झळ कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, शेजारी देश असलेल्या पाकिस्तानची महागाईने होरपळ सुरू आहे. भारताच्या त

पुष्पा 2 चे पहिले पोस्टर रिलीज
राजकीय बॉम्ब फोडण्याची स्पर्धा !
संगमनेरमध्ये निसर्गप्रेमी एकवटले

इस्लामाबाद ः भारतात महागाईची झळ कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, शेजारी देश असलेल्या पाकिस्तानची महागाईने होरपळ सुरू आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये महागाई पाच पट अधिक आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा भाव 3000 रुपयांच्या पलीकडे पोहोचला आहे. पाकिस्तानच्या सांख्यिकी विभागाच्या आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक सप्टेंबरमध्ये गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत 31.44 टक्क्यांनी वाढले आहे. ब्लूमबर्ग सर्व्हेनुसार, हीच आकडेवारी 30.95 टक्क्यांची वाढ आणि ऑगस्टमध्ये 27.4 टक्क्यांच्या वाढीच्या सरासरी अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे.

COMMENTS