Homeताज्या बातम्यादेश

गॅस सिलेंडर 209 रुपयांनी महागला

सण-उत्सवाच्या तोंडावर महागाईचा भडका

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळीचा सण उत्सव तोंडावर असतांना महागाईचा भडका उडतांना दिसून येत आहे. कारण भाजीपाल

किरीट सोमय्यांविरोधात 1 रुपयाचा मानहानीचा दावा करणार (Video)
धावत्या कंटेनरचा टायर फुटल्याने अपघात
राज्यात 20 हजार अंगणवाडी कर्मचार्‍यांची होणार भरती

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळीचा सण उत्सव तोंडावर असतांना महागाईचा भडका उडतांना दिसून येत आहे. कारण भाजीपाल्याचे भाव कडाडत असतांनाच, आता गॅस सिलेंडर महागल्याने सर्वसामान्यांची चांगलीच होरपळ होण्याची शक्यता आहे. महागाईच्या दणक्याने ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झाली असून, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. ऑईल मार्केटिग कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. त्यानुसान 19 किलो वजनाचा एलपीजी गॅस सिलेंडर 209 रुपयांनी महागला आहे.
ऐन सणासुदीचे दिवस सुरू असतानाच आता सामान्य व्यावसायिकांना झटका बसला आहे. कारण आधीच महागाईच्या झळा सोसत असलेल्या सामान्यांना गॅस सिलिंडरच्या दरवाढीने आणखी मोठी दणका दिला आहे. रविवारपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 209 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेल कंपन्यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. नवीन दर 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आता 1,684 रुपयांना विकला जाणार आहे.  कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 203.50 रुपयांनी वाढली आहे. येथे व्यावसायिक गॅस सिलिंडर 1,636.00 रुपयांऐवजी 1,839.50 रुपयांना खरेदी करावा लागणार. मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत 204 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली असून त्याची किंमत 1,482 रुपयांवरून 1,684 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे.  तर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 203 रुपयांनी वाढली असून येथे 1,695 रुपयांवरून 1898 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1731.50 रुपयांना विकला जाणार आहे. महिन्याभरापूर्वी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांनी मोठी कपात केली होती. यानंतर 1 ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तो जुन्याच दरावर कायम आहे. 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना उपलब्ध आहे. सप्टेंबर 2023 मध्ये तेल कंपन्यांनी घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात केली होती. गेल्या महिन्यात 19 किलोच्या सिलिंडरची किंमत 158 रुपये झाली होती. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये खाणेपिणे महाग होऊ शकते.

COMMENTS