Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साईपालखी रस्त्यावर स्वच्छतेसाठी कचरापेटी

सूर्यतेज संस्थेचा उपक्रम, ज्योती पतसंस्था व साईभक्तांचा सहभाग

कोपरगाव तालुका ः सूर्यतेज संस्था, कोपरगाव वतीने ज्योती पतसंस्था कोपरगाव यांचे सहभागातून स्वच्छ भारत अभियान,वन महोत्सव स्वच्छता-जलशक्ती- वृक्षारोप

आविष्कार स्पर्धेत आव्हाड महाविद्यालयाच्या संशोधन प्रकल्पाची निवड
पाहा एक्स्प्रेसच्या धडकेतून कसा बचावला तरुण | LOKNews24
समताज स्पोर्टस चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन

कोपरगाव तालुका ः सूर्यतेज संस्था, कोपरगाव वतीने ज्योती पतसंस्था कोपरगाव यांचे सहभागातून स्वच्छ भारत अभियान,वन महोत्सव स्वच्छता-जलशक्ती- वृक्षारोपण आणि पर्यावरण अभियान अंतर्गत श्री रामनवमी उत्सव निमित्ताने कोपरगांव ते शिर्डी रस्त्यावर सलग दहाव्या वर्षी भाविकांना खाद्य व पेय पदार्थ वाटप केंद्रावर मोफत कचरापेटी उपलब्ध करून दिली आहे.
सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली सूर्यतेज संस्थेच्या अभियानाला बी.एस.एन.एल.चे संचालक व ज्योती पतसंस्थेचे चेअरमन अँड. रविकाका बोरावके, वृंदावन डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉ. संदिप मुरुमकर, प्रसिध्द व्यापारी अजित शिंगी, सेवानिवृत्त नायब तहसिलदार खिंवराज दुशिंग, कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जोशी, सामाजिक कार्यकर्ते संदिप ठोके, भारत सरकारचे नोटरी अ‍ॅड.महेश भिडे, स्वच्छ व हरितचे आनंद टिळेकर, टिनू आमले, अनंत गोडसे,महेश थोरात,आकाशवाणीचे विजय कासलीवाल, रणजित पंडोरे, सचिन कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी, विद्यार्थीनी, स्वच्छतादूत पथक, महाराष्ट्र हरित सेना,यांचे सहकार्य लाभले आहे. सूर्यतेज संस्थापक व महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार सन्मानित सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छता-जलशक्ती-वृक्षारोपण आणि पर्यावरण अभियान अंतर्गत शिर्डी उपविभाग व कोपरगाव तालुक्यात अनेक उपक्रम राबविले आहे, यात सुमारे हजारो विविध झाडांचे मोफत वितरण आणि वृक्षारोपण करण्यात आले आहे. कोपरगाव ते शिर्डी या सोळा किमी महामार्गावर श्रीरामनवमी उत्सवानिमित विविध ठिकाणच्या अनेक साई पालखी पायी चालून मार्गस्थ होतात. या भाविकांना साईभक्तांकडून श्रध्देने खाद्य व पेय पदार्थ वाटप केले जाते.साईबाबांच्या पद्स्पर्शाने पावन झालेला कोपरगांव ते शिर्डी पवित्र मार्गावर स्वच्छता रथातून तात्पुरत्या स्वरूपाच्या सुमारे 350 कचरापेटी सुमारे 28 केंद्रावर उपलब्ध करून देवून कचरापेटी द्वारे कचरा संकलन अभियान राबविण्यात आले. कचरापेटी वाहतुकीसाठी स्वच्छता रथ तयार करण्यात आला होता. तसेच लाऊडस्पीकरवर स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली होती.गेल्या दोन दिवसापासून मोफत कचरापेटी वाटप केली आहे.कचरापेटीवर आपण सारे साई भक्त साईबाबांच्या पद्स्पर्शाने पावन झालेला पालखी मार्ग स्वच्छ ठेवू या. या संदेशाबरोबर ओला, सुका, सॅनिटरी वेस्ट, प्लास्टिक आणि घातक कचरा वर्गीकरण या स्वच्छता प्रबोधन संदेश सोबत उन्हाच्या तिव्रतेमुळे व्याकूळ पक्षांना खाद्य आणि पाणी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हरितसेना वृक्षसंवर्धन, माझी वसुंधरा अभियान संदेश दिला आहे. या अभियानाला श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर, उप कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे,प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप कोळी, कोपऱगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, उप मुख्याधिकारी ज्ञानेश्‍वर चाकणे यांनी सदिच्छा भेट देवून कौतुक केले आहे. सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे संकल्पनेतून झालेल्या स्वच्छता अभियानात स्वच्छताप्रेमी यांचेसह साई स्वयंसेवकांच्या सहकार्याने साई पालखी रस्ता स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गेल्या दहा वर्षाच्या या अभियानामुळे साई पालखी रस्त्यावरुन शिर्डीत येणार्‍या भाविकात स्वच्छतेविषयी जागृतता निर्माण झाली असून कचराचे ढिग आटोक्यात येवून सकारात्मक परिणाम दिसू लागले आहे. स्वच्छता अभियानाचे साईभक्तांनी स्वागत केले असून उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS