Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार

आरोपीमध्ये उपजिल्हाधिकार्‍याचा मुलगा ; आमदार धंगेकरांचा आरोप

पुणे : कोलकाता आणि बदलापूर येथील घटना समोर असतांनाच शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुण्यात एका प्राध्यापकाच्या मुलीवरच चौघांनी सामूहिक अत्याचार केल्

शाळेसमोरुन अपहरण करून धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार
ओळखीतून महिलेवर सामूहिक बलात्कार
राजधानीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

पुणे : कोलकाता आणि बदलापूर येथील घटना समोर असतांनाच शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुण्यात एका प्राध्यापकाच्या मुलीवरच चौघांनी सामूहिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. स्वप्निल गाडेकर (2 ) आणि ओम घोलप (20, रा. धनकवडी , पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच 16 वर्षे 2 विधिसंघर्षग्रस्त बालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क परिसरात एका 16 वर्षीय मुलीवर ओळखीच्या 4 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तसेच मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दोन सज्ञान आणि दोन अल्पवयीन आरोपींविरोधात कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

यासंदर्भात काँगे्रसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहून अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा केला आहे. धंगेकर यांनी या पत्रात म्हटले आहे की, वाडिया कॉलेजच्या प्रमुखपदी मंत्री उदय सामंत यांचा माजी ओएसडी असल्याचे सांगत त्याने प्राध्यापकाला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. तसेच वाडिया कॉलेजची विद्यार्थीनी असलेल्या मुलीवर अत्याचार करणार्‍यांमध्ये बड्या व्यक्तींची मुले असल्याचे सांगत या उपजिल्हाधिकार्‍यांचा मुलगा असल्याची दावा करण्यात आला आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. या मुलींवर कॉलेजच्या आवारात वेळोवेळी सामुहिक बलात्कार करण्यात आले, तसेच त्याचे व्हिडीओ काढण्यात आले आहेत. सोशल मीडियावरून हे व्हिडीओ शेअरही करण्यात आले आहेत. यातील एक मुलगी ही वाडिया कॉलेजच्या प्राध्यापकाची आहे. त्याने तक्रार केली असता दोन्ही ट्रस्टी सचिन सानप व अशोक चांडक यांच्यासह प्राचार्यानी प्राध्यापकाला सक्तीच्या रजेवर जाण्यास सांगून संस्थेची बदनामी झाल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली आहे, असे धंगेकरांनी या पत्रात म्हटले आहे. सानप हे मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी होते. ओएसडी असताना ते या संस्थेवर ट्रस्टी झाले. त्यांची भेट घेण्यासाठी पीडित मुलीचे प्राध्यापक वडील सानप यांच्या भेटीसाठी गेले होते. तिथे त्यांना तीन-चार तास बाहेरच ठेवण्यात आले. यानंतर दुपारी त्यांना आत बोलवून रात्री 11 वाजेपर्यंत तिथेच थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप धंगेकर यांनी केला आहे. त्यांच्या मुलीचा कॉलेजमधील प्रवेश रद्द करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच तिचा प्रवेशही रद्द करण्यात आल्याचा दावा धंगेकर यांनी केला आहे. स

प्राध्यापक वडिलांना महाविद्यालयाने धमकावले – प्राध्यापक वडिलांनी या प्रकरणी तक्ताळ कायदेशीर कारवाई करावी, अशी वारंवार प्रत्यक्ष भेटून या सर्वांना विनंती केली असेही समजते. परंतु या सर्वांनी एकत्रित मिळून पीडित मुलीचे वडीलांना दमदाटी व धमकाविल्याचे समजते. तसेच आपण या घटनेबद्दल कुठेही वाच्यता करून नये तसेच संस्था व महाविद्यालयाच्या नावास आपल्याकडून बाधा आल्यास आपल्यावर संस्था तक्ताळ कारवाई करील याची नोंद आपण घ्यावी असेही समजते.

आरोपींपैकी काही मुले मोठ्या बापांची मुले ?- बलात्कार करणार्‍या मुलांपैकी काही मुले ही मोठ्या बापांची मुले असून त्यातील एक मुलगा हा उपजिल्हाधिकारी यांचा मुलगा असून संस्थेचे ट्रस्टींशी त्यांच्याशी गैरमार्गाचे आर्थिक हितसंबंध आहेत. त्यामुळे आरोपी मुलाला वाचविण्याकरीता पीडित मुलीच्या वडिलांवर (प्राध्यापक) दबाव आणत आहे अशी चर्चा महाविद्यालयांतील सेवक वर्गात चालू आहे.

COMMENTS