नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राजधानी दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे दिल्ली पुन्

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः राजधानी दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. दिल्लीच्या शाहबाद डेअरी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास शाहबाद डेअरी पोलिसांकडून सुरु आहे. दिल्लीतील शाहबाद डेअरी परिसारत 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. ही घटना 27 जून रोजी घडली होती. पीडित मुलगी आपल्या मित्रासोबत पार्कमध्ये फिरायला गेली होती. यावेळी तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
COMMENTS