Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदाही गणेशोत्सव, दिवाळी होणार गोड

100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा ; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य मंत्रिमंडळाची शुक्रवारी झालेल्या बैठकीत गौरी गणपती आणि दिवाळी या सणांसाठी 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घ

राज्यात गणेशोत्सवादरम्यान 16 भक्तांचा मृत्यू
यंदाच्या गणेशोत्सवावर…राष्ट्रवादीचा वरचष्मा ?
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज

मुंबई/प्रतिनिधी ः राज्य मंत्रिमंडळाची शुक्रवारी झालेल्या बैठकीत गौरी गणपती आणि दिवाळी या सणांसाठी 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेलाचा समावेश असणार आहे. याचबरोबर राज्य सरकारने महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती.
महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण व कर) अधिनियम हा कायदा 1976 पासून अस्तित्त्वात आहे. पण, त्याची अद्याप अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे कॅसिनो सुरू करण्यास इच्छूक लोक वारंवार न्यायालयात जातात आणि कॅसिनो सुरू करण्याची परवानगी मागतात. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदाच रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता कॅसिनो सुरू करण्यावर बंदी असणार आहे. कॅसिनो कायद्यात कॅसिनोसाठीची परवाना प्रक्रीया, आकारले जाणारे शुल्क, तसेच परवाना रद्द करण्याच्या नियमांचा समावेश आहे. देशातील गोवा, सिक्किम येथे कॅसिनो गेमिंगला परवानगी आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा कायदा मंजूर करावा, अशी मागणी केली होती. मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून राज्यात कॅसिनो सुरु करण्याची मागणी केली होती. त्यामुळे येथील पर्यटन उद्योगाचा विकास होईल, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, महाराष्ट्रात कॅसिनोची ही घाण नको, अशी भूमिका पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती.दरम्यान, यासोबतच आझाद मैदान येथील प्रेस क्लबच्या विकासाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून रखडला होता. प्रेस क्लबने वारंवार सरकारकडे प्रेस क्लबच्या पुनर्विकासासाठी परवानगी मागितली होती. त्यासाठी अनेक बैठकाही झाल्या होत्या. अखेर ही मागणीही मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे प्रेस क्लबच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

आदिवासी वाडे-पाडे मुख्य रस्त्याने जोडणार – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे आदिवासी पाडे, वाडे मुख्य प्रवाहात येण्यास मदत मिळणार असून, त्यांच्यापर्यंत इतर सोयी-सुविधा देणे सोपे होणार आहे. यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार असून, त्यासाठी 5 हजार कोटीचा प्रस्ताव आहे. यासोबतख आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा 500 रुपये मिळणार आहे.

महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द – राज्य सरकारने कॅसिनो कायदा रद्दा केला आहे. गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांवर कॅसिनो सुरु करण्याचा विचार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातही याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी महाराष्ट्रात कॅसिनोची घाण नकोच, अशी स्पष्ट भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. त्यानुसार, आता कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

COMMENTS