Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आढळराव सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश शिंदे

व्हाईस चेअरमनपदी अशोक ढवळे यांची बिनविरोध निवड

श्रीगोंदा शहर : आढळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवड प्रकिया निवडणूक अधिकारी एन बी मुंढे यांच्या उप

श्रीपाद छिंदमकडून टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण l LokNews24
आनंदवाडी सेवा सोसायटी चेअरमनसह चार संचालक अपात्र
अत्याचार करणार्‍यांना प्रतिकार करण्याचे सामर्थ्य अंगीकारा

श्रीगोंदा शहर : आढळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवड प्रकिया निवडणूक अधिकारी एन बी मुंढे यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी 11 वाजता पार पडली. यामध्ये चेअरमन पदी गणेश शिंदे तर व्हा.चेअरमन पदी अशोक ढवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
आढळगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी संस्थेचे मावळते चेअरमन दादा गव्हणे आणि व्हा. चेअरमन ज्ञानदेव गाढवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या पदाच्या जागा रिक्त झाल्याने नवीन निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये चेअरमन पदीगणेश शिंदे तर व्हा. चेअरमन पदी अशोक ढवळे यांची बिनविरोध निवड झाली. याठिकाणी संचालक दत्तात्रय चव्हाण, शंकर शिंदे, दिगंबर गव्हाणे, विष्णू डोके, संतोष धोत्रे, गौरव ठवाळ, राजाराम गदादे, संचालिका रंजना डोके, लताबाई सूर्यवंशी, सचिव मुकिंदा शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी सरपंच शिवप्रसाद (बंटी) उबाळे, खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन शरद जमदाडे, लिंबू व्यापारी नवनाथ शिंदे, देवराव शिंदे, नानाभाऊ बोळगे, मनोज ठवाळ, उत्तम राऊत, संदीप सूर्यवंशी, विकास काळे, रामदास होले, पोपट काळाणे, नाना जमदाडे, सुधीरजामदार, संतोष फटे, किशोर मचे, जिजाराम डोके, सूर्यवंशी साहेब, सुभाष मिसाळ, मल्हारी डोके, सुभाष काळे, अण्णा डोके, संदीप काळाणे, नवनाथ काळाणे आदी उपस्थित होते.

COMMENTS