Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेशभक्तांचा कोकण प्रवास खड्डे मुक्त करणार

केंद्रीय मंत्री गडकरींचे खासदार वायकर यांना आश्‍वासन

मुंबई ः गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाण्यासाठी रस्ते प्रवास करणार्‍या गणेश भक्तांच्या मार्गात कुठलेही विघ्न येऊ नये याची खबरदारी घेण्याबरोबरच गणेशोत्

शाश्वत शेतीसाठी गटशेतीचा अवलंब करावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
मुख्यमंत्र्यांच्या सभेहून परतताना शिवसैनिकाच्या गाडीने चिमुकलीला उडवले ! | LOK News 24
संजय राऊतांच्या व्याह्यांचा वानखेडेंना झटका | LOKNews24

मुंबई ः गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाण्यासाठी रस्ते प्रवास करणार्‍या गणेश भक्तांच्या मार्गात कुठलेही विघ्न येऊ नये याची खबरदारी घेण्याबरोबरच गणेशोत्सवापूर्वीच मुंबई गोवा मार्गार्वरील खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्‍वासन केंद्रीय रस्ते परिवहन व राज्य मार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई उत्तर पश्‍चिमचे खासदार रवींद्र वायकर यांना दिले.
मुंबई गोवा राज्य मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या 10 वर्षापासून सुरु आहे. 471 कि.मी रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम 2011 पासून सुरु करण्यात आले. अद्याप हे काम पूर्ण झाले नसून या कामाला विलंब होत आहे. या राज्य मार्गाचे काम टप्प्या टप्प्याने करण्यात येत आहे. अद्याप या मारागाचे काम पूर्ण करण्यात आले आहे, त्यातील अनेक ठिकाणावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या राज्य मार्गावरून प्रवास करताना प्रवाश्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे गणेशोत्सवापुर्वा मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास खड्डे मुक्त करवा, असे निवेदन खासदार रवींद्र वायकर यांनी मंत्री गडकरी यांना दिले. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा राज्य मार्गावर खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्‍वासन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. त्याचबरोबर या मार्गावर बांधण्यात येणारे ट्रामा हॉस्पिटलचे काम लवकर सुरु करून ते पूर्ण करावे, अशी विनंती वायकर यांनी मंत्री नितिन गडकरी यांना यावेळी केली. तसेच डिसेंबर पर्यत या राज्य मार्गाच्या चौपदरी करण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असेही मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले. मुंबई गोवा राज्य मार्गावरील भोस्ते घात येथे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. भोस्ते व परुशुराम घाट येथे भूउत्खलन होता आहे. त्यामुळे या दोनही ठिकाणी टनेल बांधण्याचे काम करण्यात यावे, अथवा रेल्वे मार्गाला लागून समांतर रस्ता तयार करण्यात यावा., असे वायकर यांनी गड्कारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

COMMENTS