देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा येथील गणेश अंबिलवादे गेल्या 8 वर्षांपासून व्हिजन महाराष्ट्र या दिवाळी अंकाच्या माध्यमातून राज्यातील विविध घटना घड
देवळाली प्रवरा ः देवळाली प्रवरा येथील गणेश अंबिलवादे गेल्या 8 वर्षांपासून व्हिजन महाराष्ट्र या दिवाळी अंकाच्या माध्यमातून राज्यातील विविध घटना घडामोडींचा आलेख वाचकांपर्यंत मांडून वाचन संस्कृती वाढीसाठी कार्य करत असल्याचे प्रतिपादन राजपथ इंफ्रॉकोनकंपनीचे संस्थापक अध्यक्ष व दौंड शुगरचे चेअरमन जगदीश कदम यांनी केले.
देवळाली प्रवरातील बागाईत पीक सोसायटी येथे गणेश अंबिलवादे यांनी संपादित केलेला दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा दिवाळी पाडव्याच्या दिवशी उद्योजक जगदीश कदम व माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रारंभी संपादक अंबिलवादे यांनी स्वागत केले. पुढे बोलताना उद्योजक जगदीश कदम म्हणाले की, मनुष्याला संपन्न व समृद्ध करणारी वाचन संस्कृती वाढली पाहिजे. वाचन संस्कृती जागृत ठेवण्याचे काम व्हीझन महाराष्ट्र दिवाळी अंकाच्या माध्यमातून गणेश अंबिलवादे हे करत असल्याचे ते म्हणाले. माजी आ.चंद्रशेखर कदम म्हणाले की, व्हीझन महाराष्ट्र दिवाळी अंकातील लेख हे निश्चित वाचनीय आहे. समाजातील अनेक घटनांवर प्रकाश टाकणारे लेख यात प्रसिध्द केलेले असून ते वाचकांना भावेल असे ते म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, गोरक्षनाथ मुसमाडे, मच्छीन्द्र कदम, उद्योजक तथा माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, सोपान शेटे, उत्तमराव मुसमाडे, भाऊसाहेब वाळुंज ,भारत शेटे, भीमराज मुसमाडे, डॉ.भागवत वीर,अभिजित कदम, सुधीर टिक्टल आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS