Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खड्ड्यांना हार घालून गांधीगिरी ; युवक काँग्रेसचे आंदोलन

आयुक्त साहेब, भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी का घालता? युवक काँग्रेसचा सवाल

अहमदनगर/प्रतिनिधी ः रस्ते घोटाळा प्रकरणातील बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट विषयावरून काँग्रेसची आंदोलनांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी द

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले आमदार आशुतोष काळे
डॉ. कुमार सप्तर्षी यांना जीवन गौरव पुरस्कार

अहमदनगर/प्रतिनिधी ः रस्ते घोटाळा प्रकरणातील बनावट थर्ड पार्टी रिपोर्ट, टेस्ट रिपोर्ट विषयावरून काँग्रेसची आंदोलनांची मालिका सुरूच आहे. गुरुवारी दुपारी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रहदारीच्या असणार्‍या झोपडी कॅन्टीन ते गंगा उद्यान रस्त्यावरील खड्ड्यांना हार घालत एक खोका, नगरकरांना धोका अशी घोषणाबाजी केली आहे. खड्ड्यांना हार घालत आम्ही मनपा आयुक्त, आमदार, महापालिका पदाधिकारी, नगरसेवक, शहर अभियंता, बांधकाम विभागाचे सर्व तथाकथित तज्ञ अभियंते यांना शहराला खड्ड्यात घातल्याबद्दल आणि भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालत असल्याबद्दल विनम्र अभिवादन केल्याचे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड यांनी म्हटले आहे.
यावेळी करण्यात आलेल्या आंदोलनात गायकवाड यांच्यासह इंजिनिअर सुजित क्षेत्रे, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट, उपाध्यक्ष गौरव घोरपडे, प्रणव मकासरे, सरचिटणीस आनंद जवंजाळ, विशाल शिंदे आदींसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गायकवाड म्हणाले की, मनपात बनावट रिपोर्ट प्रकरण आणि त्यातून झालेला रस्ता महा घोटाळ्यातील भ्रष्टाचार दडपण्यासाठी, गुन्हे दाखल होऊन त्यासाठी रात्रीच्या अंधारात ’तडजोडी’ सुरू झाल्या आहेत. यात खोक्यांची भाषा सुरु झाली आहे. त्यामुळेच भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नगरसेवक, राजकीय पदाधिकारी अलिशान गाड्यांमधून फिरतात. त्यांच्या गाड्यांचे सस्पेन्शन चांगले आहे. पण सामान्य नगरकर अशा महागड्या गाड्या घेऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांच्या पाठीचे मणके खिळखिळे झाले आहेत. नागरिकांच्या पैशांची लूट करून आता तो जिरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी भ्रष्टाचार्‍यांवर गून्हे दाखल न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

COMMENTS