Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेजुरीतील गाभारा दीड महिना दर्शनासाठी बंद

विकास आरखड्यातील कामांसाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून (दि 28) दुरुस्तीच्या कामासाठी

ऋषिकेश येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या वाहनाला अपघात; चौघांचा मृत्यू
नक्षली कमांडर संतोष शेलार पोलिसांना शरण
आरक्षणाच्या न्यायासाठी ओबीसींचे विभाजन आवश्यक !

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य मंदिराचा गाभारा व घोड्याचा गाभारा सोमवारपासून (दि 28) दुरुस्तीच्या कामासाठी 5 ऑक्टोबरपर्यंत तब्बल दीड महिना बंद राहणार आहे. यामुळे भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून, दोन्ही गाभार्‍यांत जाता येणार नाही अशी माहिती खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्‍वस्त पोपटराव खोमणे यांनी दिली.
खंडोबा गडावर महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू आहेत. खंडोबा गडाचे जतन करण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या व उपाययोजना केल्या जात असून या साठी सुमारे 107 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र, इतर कोणालाही गाभार्‍यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही, असे विश्‍वस्त मंडळाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या काळात खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. मात्र इतर कोणालाही गाभार्‍यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही. मुख्य गाभार्‍याचे काम सुरु असताना गडावर येणार्‍या भाविकांच्या अभिषेक महापूजा या पंचलिंग भुलेश्‍वर मंदिरात करण्यात येणार आहेत. आतील गाभार्‍याचे काम पूर्ण झाल्यावर पंचलिंग मंदिराचे काम करताना भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य मंदिरात पूजा करु द्याव्यात, अशी मागणी विकास कामांच्या नियोजनासंदर्भातील बैठकीत करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील जेजुरी गावात खंडोबाचे देवस्थान आहे. या ठिकाणी राज्यभरातून नागरिक येत असतात. हे मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. खंडोबाचे हे जागृत देवस्थान समजले जाते.

COMMENTS