नाशिक : ग्राम विकास विभागाच्या मान्यतेनुसार दि. २५ जुलै ते दि. ३० जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या ग्रामसेवक पेसा व नॉन पेसा पदाच्या परीक्षेचा निकाल
नाशिक : ग्राम विकास विभागाच्या मान्यतेनुसार दि. २५ जुलै ते दि. ३० जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या ग्रामसेवक पेसा व नॉन पेसा पदाच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून प्राप्त झाल्यानंतर गुरुवार दि. १४.०९.२०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या मान्यतेने जाहिर करण्यात आला असून सदर निकाल नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नाशिक जिल्हा परिषदेने दि. ०५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरात क्र. १/२०२३ मधील ग्रामसेवक पेसा व नॉन पेसा या पदांकरिता दि. २५ जुलै व दि. २९,३० जुलै दरम्यान आयबीपीएस (इंस्टीट्युट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन, मुंबई ) या संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. याकरिता एकूण ११७२८ उमेदवारांनी अर्ज केला होता यातील ४९३९ उमेदवारांनी परीक्षा दिली. *यातील ४५% पेक्षा जास्त म्हणजेच ९० पेक्षा जास्त गुण मिळवणार्या १९१३ परीक्षार्थींचा निकाल जाहीर निकाल आला.*
जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली, तसेच जिल्हा परिषदेच्या परीक्षेकरिता “नोडल अधिकारी” तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी व जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत आयबीपीएस या संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. यासाठी भरारी पथक प्रमुख प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे व प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, प्रत्येक परीक्षा केंद्राकरिता “व्हेन्यु ऑफिसर” व सहाय्यक अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.
COMMENTS