Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जी-20 चे प्रतिनिधित्व भारताच्या विकासाला बळकटी देणारे – प्रा. डॉ. हर्षा गोयल

कोपरगाव प्रतिनिधी : येथील के. जे. सोमैया महाविद्यालयात कै. के. बी. रोहमारे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित तीनदिवसीय कै. के. बी. रोहमारे

बेलापुरात चार गावठी कट्ट्यांसह दोघे जेरबंद
काष्टीत 15 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पिस्तुल चोरी
चौपदरी रस्त्यांचा 187 कोटींचा मंजूर निधी गेला परत

कोपरगाव प्रतिनिधी : येथील के. जे. सोमैया महाविद्यालयात कै. के. बी. रोहमारे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित तीनदिवसीय कै. के. बी. रोहमारे वित्तीय व्याख्यान मालेच्या उद्घाटन प्रसंगी के.बी.पी. महाविद्यालय, मुंबई येथील वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या अधिष्ठाता प्रा. डॉ. हर्षा गोयल यांनी आपल्या भाषणात जी20 चे प्रतिनिधित्व भारताच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकटी देणारे ठरेल असा आशावाद व्यक्त केला अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी दिली.
पहिल्या दिवसाच्या सत्रात प्रा. गोयल यांनी ’जी-20 आणि भारताचे प्रतिनिधीत्व’ या विषयावर आपले मत व्यक्त करताना जी-20 चे प्रतिनिधीत्व भारताच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची आर्थिक आणि राजकीय ताकद वाढविण्यासाठी मदत करेल. जी-20 ही अशी आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे कि, जिच्या आधारे संपूर्ण जग एक कुटुंब म्हणून काम करून एकमेकांना सहकार्य आणि विकासात हातभार लावण्यासाठी मदत करत आहेत. त्यासाठी भारताने यावर्षी जी-20 चे प्रतिनिधीत्व करत आहे हे भूषणावह आहे हे सांगताना या वर्षीची जी -20 ची उद्दीष्टे स्पष्ट केली. दुसर्‍या दिवशीच्या सत्रात बँकिंग क्षेत्रातील फिनटेक  या विषयावर एच. डी. एफ.सी. बँकेच्या कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी नंदू राऊत यांनी मार्गदर्शन केलेे.  त्यांनी आपल्या व्याख्यानात बँकिग क्षेत्रातील ब्लॉकचैन व्यवस्थापन प्रणाली, डिजिटल बंकिग सह विविध  आधुनिक प्रवाह व त्यामधील करीयरच्या संधी यावर मार्गदर्शन केले. तिसर्‍या दिवशीच्या सत्रात दिशा कॉम्प्युटर्स चे अजय नंन्नावरे यांनी ’ डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटीलिजेन्स ’ या विषयावर मार्गदर्शन करताना संगणक शास्त्रात गतीने बदलणार्‍या प्रवाह याविषयी सखोल माहिती सांगून संगणकीय हिशेबलेखन यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजनाचा हेतू वाणिज्य शाखेचे विभागप्रमुख प्रा. डॉ. संतोष पगारे आणि प्रा. संजय अरगडे यांनी स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. रवींद्र जाधव यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. सोनाली आव्हाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. अजित धनवटे, प्रा.मुकेश माळवदे, प्रा. सुनील गुंजाळ, प्रा. स्वागत रणधीर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनांबद्दल को. ता. ए. सोसायटीचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे, सचिव ड. संजीव कुलकर्णी, विश्‍वस्त श्री. संदीप रोहमारे व प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी अभिनंदन करून जी-20 सारख्या महत्वाच्या विषयावर व्याख्यान आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

COMMENTS