सांगली प्रतिनिधी - सांगलीत आज गॅस दरवाढीच्या निषेधार्थ मदनभाऊ पाटील युवा मंचाने अनोखे आंदोलन करत सर्वांच लक्ष वेधलं. वाढत्या गॅस सिलेंडर

सांगली प्रतिनिधी – सांगलीत आज गॅस दरवाढीच्या निषेधार्थ मदनभाऊ पाटील युवा मंचाने अनोखे आंदोलन करत सर्वांच लक्ष वेधलं. वाढत्या गॅस सिलेंडरच्या दराने सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले आहेत आणि याच महागाईकडे लक्षवेधन्यासाठी मदन भाऊ पाटील युवा मंचाने सांगलीमध्ये चक्क गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा काढत गॅस सिलेंडरवर अंत्यविधी सुद्धा पार पाडला. या प्रतीकात्मक आंदोलनामुळे मात्र या आंदोलनाची सांगलीमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमी मध्ये गॅस सिलेंडरच्या प्रतिकृतीचे दहन करत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माती सावरण्याचा कार्यक्रम त्याच ठिकाणी कार्यकर्त्यांनी उरकून घेत अंत्यविधीच्या सर्वच धार्मिक प्रक्रिया पूर्ण केल्या. मदन भाऊ पाटील युवा मंचाचे अध्यक्ष आनंद लेंगरे व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे अनोखे आंदोलन करत महागाई कडे सरकारचं लक्ष वेधलं. यावेळी महिलांनी सुद्धा आंदोलनात सहभाग घेत सरकारच्या विरोधात शंखध्वनी केला.
COMMENTS