Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूर-खंडाळा-अस्तगाव या रस्त्यांना निधी मंजूर करणार

खासदार सदाशिव लोखंडे यांचे शिष्टमंडळाला आश्‍वासन

बेलापूर/प्रतिनिधी ः बेलापूर-खडाळा-अस्तगाव या कुर्‍हे वस्ती रस्त्याच्या उर्वरित कामाला पाठपुरावा करून निधी उपलब्ध करू देऊ असे आश्‍वसन खासदार सदाशि

राहुरी फॅक्टरी येथे ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन
सुसंस्कारी पिढी घडविण्याचे कार्य वाचनालयाच्या माध्यमातून होणार -आ. निलेश लंके
पोटच्या मुलांचा खून करणार्‍या कर्जतमधील बापाला जन्मठेपेची शिक्षा

बेलापूर/प्रतिनिधी ः बेलापूर-खडाळा-अस्तगाव या कुर्‍हे वस्ती रस्त्याच्या उर्वरित कामाला पाठपुरावा करून निधी उपलब्ध करू देऊ असे आश्‍वसन खासदार सदाशिव लोखंडे यांनी सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील कुर्‍हे वस्ती परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिले.
कुर्‍हे वस्ती वरील रस्त्याची परिस्थिती अत्यंत खराब झाली असून या रस्त्याच्या कामाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्रामपंचायत बेलापूर बुद्रुक तसेच कुर्‍हे वस्ती परिसरातील नागरिकांच्या वतीने खा. सदाशिव लोखंडे यांच्याकडे करण्यात आली होती.या मागणीची दखल घेत खासदार सदाशिव लोखंडे यांनी खासदार निधीमधून 10 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला व नुकतेच त्या निधीतून रस्त्याचे काम करण्यात आले. याबद्दल लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उर्वरित रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.या निवेदनात बेलापूर-खंंडाळा-अस्तगाव(प्रजिमा12)हा रस्ता कुर्‍हे वस्ती, जवाहरवाडी, टिळकनगर, रांजणखोल, खंडाळा, अस्तगाव असा आहे. हा रस्ता वर्दळीचा असून वाहतुकीसाठी महत्वाचा आहे.तसेच हा रस्ता झाल्यास शिर्डी या तिर्थस्थळला जाण्यासाठी अत्यंत सोयीचा होणार आहे.या रस्त्यामुळे बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावरचा वाहतुकीचा भार कमी होणार आहे. सध्या हा रस्ता अत्यंत खराब झाला असून वाहतुकीसाठी अडचणीचा झाला आहे.यामुळे सदर रस्त्याचे नुतणीकरण व मजबुतीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी खासदार निधीतून या रस्त्याचे कामासाठी निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुरषोत्तम भराटे, प्रभात कुर्‍हे, अशोक कुर्‍हे, बापूसाहेब कुर्‍हे, सुनिल जाधव, दत्ता साळुंके, महेश कुर्‍हे, प्रफुल्ल कुर्‍हे, बापूसाहेब निर्मळ आदी उपस्थित होते.

COMMENTS