Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औंधच्या 16 गावच्या सिंचन योजनेला निधी उपलब्ध करणार : ना. अजित पवार

औंध : सिंचन योजनेला निधीची तरतूद करण्यासाठी शिष्टमंडख अजित पवार यांच्याशी चर्चा करताना. औंध / वार्ताहर : औंधसह 16 गावच्या सिंचन योजनेला कार्यान्

पत्रकार मोहन मस्कर-पाटील यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन
महाबळेश्‍वर येथून वेण्णा नदी संवाद यात्रेचा उत्साहात प्रारंभ
खूनातील संशयिताचा सांगली जिल्हा रुग्णालयात धिंगाणा

औंध / वार्ताहर : औंधसह 16 गावच्या सिंचन योजनेला कार्यान्वित करण्यासाठी आजमितीस किती खर्च लागेल, कशा पध्दतीने लवकर कामास गती येईल इत्यादी बाबींचा विचार करून या योजनेवर लवकरात लवकर निधी कसा उपलब्ध करता येईल. याची पूर्ण माहिती घेऊन तरतूद करणार असल्याचा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औंधच्या शिष्टमंडळाला दिला.
औंधसह 16 गावांच्या शेती पाणी संघर्ष समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या योजनेला तात्काळ निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती करत निवेदन दिले. यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, अध्यक्ष संतोष मांडवे, उपाध्यक्ष धनाजी आमले, खजिनदार हणमंत चव्हाण, प्रदीप गुजर, सचिन सूर्यवंशी, महादेव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, तात्काळ आता लगेचच 100 कोटी निधी उपलब्ध करता येईल. मात्र तो एक वर्षाच्या आत खर्ची पाडावा लागतो, काही नियमांचा अभ्यास करून निधी कसा टाकता येतो, काम सुरु झाल्यानंतर काम थांबू नये याचाही सारासार विचार करून योजनेचे काम सुरु करण्यासाठी व योजना पूर्ण क्षमतेने चालू होण्यासाठी जे-जे काही करावे लागेल ते करणार असल्याचे ना. पवार यांनी सांगितले
यावेळी या शिष्टमंडळाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी हणमंत शिंदे, राजेंद्र माने, गणेश देशमूख, दीपक नलवडे, वैभव हरिदास, संतोष जायकर, शहाजी यादव आदीसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS