अंबाजोगाई प्रतिनिधी - बीड जिल्ह्याच्या लोकनेत्या स्व. डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त 11 ते 15 ऑगस्ट दरम्यान वसुंधरा सेवा प्रतिष्ठान
अंबाजोगाई प्रतिनिधी – बीड जिल्ह्याच्या लोकनेत्या स्व. डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त 11 ते 15 ऑगस्ट दरम्यान वसुंधरा सेवा प्रतिष्ठान च्या वतीने भव्य भजन गायन, आराधी गायन आणि देशभक्ती पर समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या सर्व स्पर्धेत जास्तीतजास्त संघाने सहभाग घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
केज विधानसभा मतदारसंघाच्या भाग्यविधाता व बीड जिल्ह्याच्या लोकनेत्या स्व. डॉ. सौ. विमलताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणार्या ताई महोत्सवाचे हे 20 वर्षे असून या निमित्ताने वसुंधरा सेवा प्रतिष्ठान च्या वतीने अंबाजोगाई येथील नगर परिषदेच्या आद्दकवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात 11 ते 15 ऑगस्ट दरम्यान भव्य अशा भजन गायन, आराधी गायन आणि देशभक्ती पर समुह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व स्पर्धेत जास्तीतजास्त भजनी मंडळ, आराधी मंडळ आणि देशभक्ती पर समुह नृत्य स्पर्धेत विविध शाळांमधील संघांनी सहभाग घ्यावा. या स्पर्धेतील भव्य सांप्रदायिक भजन स्पर्धा ही 11 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता सुरू होणार असून या स्पर्धेत प्रथम येणार्या संघास रु. 7000/-, व्दितीय संघास रु. 5000/-, तृतीय संघास रु.3000/- तर उत्तेजनार्थ संघास रु. 1500/- रोख व स्मृतिचिन्ह आणि सहभागी होणा-या सर्व स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. भव्य समुह आराधी गायन स्पर्धा ही 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता सुरू होणार असून या स्पर्धेत प्रथम येणार्या संघास रु. 5000/-, व्दितीय संघास रु. 3000/-, तृतीय संघास रु.2000/- तर उत्तेजनार्थ संघास रु. 1000/- रोख व स्मृतिचिन्ह आणि सहभागी होणा-या सर्व स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील देशभक्ती पर समुह नृत्य स्पर्धा ही 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता सुरू होणार असून ही स्पर्धा लहान (यु केजी ते वर्ग 6) आणि मोठा गट (वर्ग 7 ते 10) या दोन गटांसाठी होणार असून या स्पर्धेत प्रथम येणार्या संघास रु. 3000/-, व्दितीय संघास रु. 2000/-, तृतीय संघास रु.1500/- तर उत्तेजनार्थ संघास रु. 1000/- रोख व स्मृतिचिन्ह आणि सहभागी होणा-या सर्व स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या सर्व स्पर्धेतील नाव नोंदणीसाठी प्रकाश बोरगांवकर (7517664761), बळीराम चोपडे (7219250999), अनंत आरसुडे (7276189999), हभप इनामदार गुरुजी (9552678837), महादेव सुर्यवंशी (9767780201), डॉ. वासुदेव नेहरकर (9421525530), सतीष मुळे (9511910707) यांच्याशी सोबत दिलेल्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन वसुंधरा सेवा प्रतिष्ठान च्या वतीने नंदकिशोर मुंदडा, आ. सौ. नमिता अक्षय मुंदडा यांनी केले आहे.
COMMENTS