Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी मुलावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार

कराड / प्रतिनिधी : किरपे (ता. कराड) येथील राज धनाजी देवकर (वय 5 वर्षे) या शेतकर्‍याच्या मुलावर नुकताच बिबट्याने हल्ला केला होता. या जखमी मुलावर कृष्ण

*LokNews24 : अंगावर थुंकल्याच्या रागातून ‘त्या’ महिलेचा तरुणाने केला खून l पहा LokNews24*
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवासातील सातारा
भारतीय संविधान सक्षम : प्राचार्य बाळ कांबळे

कराड / प्रतिनिधी : किरपे (ता. कराड) येथील राज धनाजी देवकर (वय 5 वर्षे) या शेतकर्‍याच्या मुलावर नुकताच बिबट्याने हल्ला केला होता. या जखमी मुलावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू असून, या मुलावरील उपचाराचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा निर्णय कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी घेतला आहे. दरम्यान, डॉ. सुरेश भोसले आणि भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी मुलाच्या प्रकृतीची विचारपूस केली. बिबट्याशी झुंज देणार्‍या मुलाच्या वडिलांच्या धाडसाचे कौतुकही त्यांनी यावेळी केले.
किरपे येथे 20 जानेवारी रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास शेतकामासाठी वडिलांसोबत गेलेल्या राज धनंजय देवकर याच्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने त्याच्या मानेला पकडून शेतात फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी वडील धनंजय देवकर यांनी बिबट्याशी दोन हात करत आपल्या मुलाला बिबट्याच्या जबड्यातून सोडविले. या झटापटीत मुलाची मान व शरीरावर जखमा झाल्या. तात्काळ त्याला उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आले होते.
या प्रकाराची माहिती समजताच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी जखमी मुलाच्या प्रकृतीची चौकशी केली. त्याच्यावरील उपचारांकडे विशेष लक्ष देण्याची सूचना वैद्यकीय अधिकार्‍यांना दिल्या. तसेच बिबट्याशी झुंज देणार्‍या वडिलांच्या धाडसाचे कौतुक करत, या मुलावरील वैद्यकीय उपचाराचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

COMMENTS