Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुळव्याध, भगंदर आजारावर आता मोफत शस्त्रक्रिया

प. पु. गुरु माऊली अण्णासाहेब मोरे आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शिबिराचे आयोजन रुग्णांनी संधीचा लाभ घ्यावा - डॉ.राजेभोसले

माजलगाव प्रतिनिधी - मालीपारगाव येथील प.पु.गुरु माऊली अण्णासाहेब मोरे आयुर्वेदिक कॉलेज अँड कॅन्सर रिसर्च सेंटर मालीपारगाव व रोटरी क्लब ऑफ माजलगां

सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू होणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात
डाँ.तनपुरे कारखान्याला गळीत हंगामाची परवानगी नसताना गुपचुप उरकला गळीत शुभारंभ

माजलगाव प्रतिनिधी – मालीपारगाव येथील प.पु.गुरु माऊली अण्णासाहेब मोरे आयुर्वेदिक कॉलेज अँड कॅन्सर रिसर्च सेंटर मालीपारगाव व रोटरी क्लब ऑफ माजलगांव सेंट्रल यांचे संयुक्त विद्यमाने मुळव्याध ,फिशर, भगंदर या आजारा बाबत मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर यशवंत राजेभोसले यांनी दिली असून माजलगाव तालुक्याचे परिसरातील आजारी आजाराशी संबंधित रुग्णाने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्याच्या  बदलत्या जीवनशैलीमुळे मूळव्याध किंवा शौचास निगडित असे फिशर भगंदर सायनस फिश्च्युला अशा आजारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्या प्रमाणात सर्वसामान्यांमध्ये या आजाराबद्दल किंवा त्यातील साध्या सोप्या प्रतिबंधात्मक उपचाराबाबत माहिती दिसत नाही किंवा शौचास निगडित हे आजार असल्याने रुग्ण या बद्दल कुठे बोलत नाहीत व व्यक्त होत नाहीत किंवा योग्य ठिकाणी उपचार घेत नाहीत किंवा चुकीच्या व अघोरी उपचाराचे बळी ठरत आहेत.या आजारात आयुर्वेदिक तसेच अलोपॅथीक उपचार पद्धतीने व गरजेचे असल्यास शस्त्रक्रिया करून हे आजार कायमचे दूर करता येतात याची सर्वाना माहिती व्हावी या उद्देशाने माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव येथील गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे मेडिकल कॉलेज  येथेङ्गरविवार दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी 11 वाजल्यापासून दि.17 एप्रिल सोमवार पर्यंत मोफत मूळव्याध भगंदर तपासणी उपचार तसेच शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,शिबिरात अनेक नामवंत तज्ञ डॉक्टर्स कडून उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या  जाणार आहेत.शस्त्रक्रिया दरम्यान औषधी तत्सम चाचण्या व फिटनेस साठी कराव्या लागणार्या चाचण्या व पौष्टिक जेवण अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.याचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा येते वेळेस रुग्णांनी आपल्या इतर आजाराबद्दलची सर्व कागदपत्रे सोबत आणावेत तसेच अधिक माहितीसाठी रुग्णांनी 7822881559 व 9423686188 या मोबाईल नंबर वर संपर्क करावा असे आवाहन संयोजन समिती कडून करण्यात आले असल्याचे  डॉक्टर यशवंत राजेभोसले यांनी म्हटले आहे.

COMMENTS