Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोफत वधू-वर ग्रुपची आज खरी गरज ः मीनाताई जगताप

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे की,  घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ आजच्या काळात घर बांधणे सोपे झाले आहे पण लग्न करणे

महाराष्ट्र दिनानिमित्त आ. आशुतोष काळेंच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात
शिवराज्याभिषेकासाठी मुस्लिम तरुणाने आणले गंगाजल
श्रीगोंद्यात डाळिंब चोरी करणारे दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे की,  घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून’ आजच्या काळात घर बांधणे सोपे झाले आहे पण लग्न करणे, लग्न जमवणे खूपच अवघड झाले आहे. आजच्या काळात सुखी संसारासाठी जोडीदार शोधणे, लग्न जमविणे ही तारेवरची कसरत झाली आहे. त्यासाठी आपुलकीने, निःस्वार्थीपणे, सामाजिक बांधिलकीच्या नात्याने काम करणार्‍या ’साई तारा’ या मोफत वधू-वर ग्रुप सारख्या अनेक ग्रुपची आवश्यकता ही काळाची गरज आहे असे  प्रतिपादन केडगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील उपाध्यापिका श्रीमती मीनाताई अनिल जगताप यांनी केले.
     श्रीरामपूर येथील निवृत्त प्राध्यापक रामचंद्र ताराबाई सुंदरदास राऊत यांनी सुरू केलेल्या ’साई तारा’ मोफत वधू वर सूचक मार्गदर्शन केंद्र (ग्रुप) च्या उद्घाटन प्रसंगी मीनाताई जगताप बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीमती कमलताई जगताप यांनी भूषविले होते. माझ्या मुलीचे लग्नसुद्धा वधू-वर ग्रुपच्या माध्यमातूनच जमलेले असून जावई पाहिजे तसे, आमच्या अपेक्षेप्रमाणे आणि अगदी योग्य असे भेटले असे सांगून आपल्या प्रमुख भाषणात मीनाताई जगताप पुढे म्हणाल्या की, समाजात वावरताना आज लग्नाच्या बाबतीत आपणास काय चित्र दिसते हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. याला कोण जबाबदार आहे यावरही मी काही बोलणार नाही. मी फक्त एवढेच म्हणेन की, तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमवितांना तुम्ही कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा ठेवूच नका. भरमसाठ, आभाळा एवढ्या अपेक्षा ठेवल्या तर लग्न कसे जमेल ? कुठंतरी तडजोड केली तरच लग्न जमू शकेल. मुला – मुलीचे लग्न न होण्याचे सर्वात म्हत्त्वाचे कारण म्हणजे प्रत्येकाच्या वाढत्या अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अध्यक्षीय भाषणात श्रीमती कमलताई जगताप यांनी मुला-मुलींच्या वाढत्या वयाबाबत चिंता व्यक्त करून पालकांनी योग्य वयातच मुला-मुलींचे लग्न जमवावे असे आवाहन केले. या प्रसंगी श्रीमती मीनाताई जगताप, श्रीमती कमलताई जगताप, कु.  पायल जगताप व कु. तनुजा जगताप यांना प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये लिखीत’ फिरत्या चाकावरती, ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे अग्निपंख आणि प्रा. डॉ. स्नेहल तावरे लिखित मराठी शुद्धलेखन नियमावली ही पुस्तके देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सकल मराठा सोयरिकु ग्रुपच्या राजाध्यक्षा प्राचार्या रजनीताई गोंदकर , सकल मराठा सोयरिक ग्रुपचे समन्वयक जयकिसन वाघ पाटील आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सर्वश्री मयूर जगताप, संग्राम जगताप, राजश्री राऊत, रामेश्‍वरी लाटे, रामकृष्ण गुंजाळ, विजयरत्न राऊत, जतीन लाटे, रीतीषा लाटे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री संगीत राऊत, सुनीत राऊत, राजश्री राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. रेश्मा राऊत यांनी सूत्र संचलन केलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी शुभांगी राऊत यांनी आभार मानले.

COMMENTS