मुंबई ः अंधेरी पश्चिमेकडील डीएम नगर परिसरात एका व्यावसायिकाला पोलीस असल्याचे सांगत लुटल्याची घटना घडलीये. याप्रकरणी डी एन नगर पोलीस ठाण्यात गुन्

मुंबई ः अंधेरी पश्चिमेकडील डीएम नगर परिसरात एका व्यावसायिकाला पोलीस असल्याचे सांगत लुटल्याची घटना घडलीये. याप्रकरणी डी एन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीची ओळख पटवली. आरोपी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी सापळा रचून आरोपीस अटक केली आहे. पोलिसांच्या तावडीतून सुटका व्हावी म्हणून आरोपी आणि त्याच्या साथीदारांकडून पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आली. यावर मोठ्या शिताफीने पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. फिरोझ फय्याज खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
COMMENTS