Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितकडून चौथी यादी जाहीर ; 16 उमेदवारांची घोषणा

मुंबई :महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून सर्वच पक्ष आता जागावाटपावरून चर्चा करत आहेत. यात वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या उमेदवारां

सिंचन विहिरींसाठी आणि अधिकार्‍यांवरील कारवाई विरोधात आमदार रोहित पवार यांनी दंड थोपटत दिला आंदोलनाचा इशारा
धोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात
कसब्यात साडेपाच लाखांची रोकड जप्त

मुंबई :महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून सर्वच पक्ष आता जागावाटपावरून चर्चा करत आहेत. यात वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 16 उमेदवारांचा समावेश आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने तिसरी यादी जाहीर केली होती. त्यात 30 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या चौथ्या यादीत शहदा, साक्री, तुमसर, अर्जुनी मोरगाव, हादगाव, भोकर, कळमनुरी, सिल्लोड, कन्नड, औरंगाबाद पश्‍चिम, पैठण, महाड, गेवराई, आष्टी,कोरेगाव, कराड दक्षिण अशा सोळा मतदारसंघाचा समावेश आहे. औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून अंजन लक्ष्मण साळवे यांना उमेदवारी दिली आहे, तर सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून मनोहर जगताप यांना उमेदवारी घोषित केली आहे.

COMMENTS