Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोहोळजवळ अपघातात चार महिला भाविकांचा मृत्यू; सहा जण जखमी

सोलापूर प्रतिनिधी - सोलापूरमधील मोहोळजवळील यावली गावाजवळ मालट्रक व कारच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याची दुदैवी घटना

परीक्षेहून परतणाऱ्या ३ विद्यार्थीनींवर काळाचा घाला 
दुर्देवी ! चिमुकल्याला वाचवताना आईचा गेला जीव.
दुचाकी स्वार गाडी स्लिप होऊन पडला ड्रेनेज मध्ये .

सोलापूर प्रतिनिधी – सोलापूरमधील मोहोळजवळील यावली गावाजवळ मालट्रक व कारच्या धडकेत चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याची दुदैवी घटना बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रांजणगाव (ता. पारनेर जिल्हा अहमदनगर) येथील महिला भाविक कार गाडीतून तुळजापूरसाठी दर्शनासाठी चालले होते. या  कारची यावली गावच्या परिसरात पुणे – सोलापूर महामार्गावर सोलापूरकडे जाणाऱ्या मालट्रकला पाठीमागून भीषण धडक बसून झालेल्या अपघातात तीन महिला भाविक जागीच मयत झाले. एका महिलेचा सोलापूर सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला असून चार महिला भाविक जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. अशी प्राथमिक माहिती मोहोळ पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. अपघातामधील मृत हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निकतवर्तीय नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.

COMMENTS