Homeताज्या बातम्यादेश

जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

पुंछमध्ये सुरू होती 9 तास चकमक

श्रीनगर/वृत्तसंस्था ः जम्मू-काश्मीर खोर्‍यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या असून, काल पुंछमधील सिंध्रा भागात सुरक्

येथील लग्नाला निघालेल्या वऱ्हाडी मंडळींच्या गाडीचा अपघात | LOK News 24
स्मार्ट मीटरमुळे ग्राहक सेवेचा दर्जा वाढणार : विजय सिंघल
मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू

श्रीनगर/वृत्तसंस्था ः जम्मू-काश्मीर खोर्‍यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या असून, काल पुंछमधील सिंध्रा भागात सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाईत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. कारवाईत मारले गेलेले सर्व दहशतवादी परदेशी आहेत. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सुरू झालेली ही चकमक मंगळवारी पहाटेपर्यंत सुरू होती. नऊ तास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. या कारवाईत भारतीय लष्कराचे विशेष दल, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे जवान सहभागी झाले होते.
भारतीय लष्कराने सांगितले की, ऑपरेशन त्रिनेत्र-2 अंतर्गत, पुंछ भागात वेढा घातल्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. 16-17 जुलैच्या मध्यरात्री लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. यादरम्यान एके-74 रायफल आणि 11 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. 16-17 जुलैच्या मध्यरात्री लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडला. यादरम्यान एके-74 रायफल आणि 11 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलीस गेल्या दोन दिवसांपासून शोध मोहीम राबवत आहेत. सोमवारी संयुक्त कारवाईत दोन घुसखोर मारले गेले. लष्कराच्या म्हणण्यानुसार, सीमेजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली.
दुसरीकडे, जम्मू-काश्मीर प्रशासनाने 17 जुलै रोजी तीन सरकारी कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे. या तिघांवर पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांसाठी काम करणे आणि दहशतवाद्यांना रसद पुरवल्याचा आरोप आहे. ते दहशतवादी विचारसरणीला प्रोत्साहन आणि दहशतवादी निधी उभारण्याचे कामही करत होते.

COMMENTS